---Advertisement---

कसोटी चँपियनशीपच्या ‘या’ विक्रमांत फिरकीपटू अश्विन ठरला अव्वल, कमिन्स-ब्रॉडलाही टाकलं मागे

On: बुधवार, जून 23, 2021 10:10 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदद्वारे (आयसीसी) आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना साउथम्पटनमध्ये खेळला जात आहे. या ऐतिहासिक सामन्याचे जेतेपद मिळवण्यासाठी उभय संघाचे खेळाडू झगडताना दिसत आहेत. या सामन्याच्या राखीव दिवशी (२३ जून) भारतीय संघाने न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने तगडी सलामी देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने त्यांच्या सलामी जोडीला माघारी धाडले. यासह अश्विनने मोठा किर्तीमान केला आहे.

३४ वर्षीय अश्विनने सर्वप्रथम न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला यष्टीरक्षक रिषभ पंतच्या मदतीने यष्टीचीत केले. चौदाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लॅथम अवघ्या ९ धावांवर पव्हेलियनला परतला. त्यानंतर १७.२ षटकात त्याने न्यूझीलंडचा धाकड फलंदाज डेवॉन कॉनवेला बाद करत भारतीय संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. याबरोबरच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमातही अव्वलस्थानी उडी घेतली आहे.

अश्विनच्या आतापर्यंत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ७१ विकेट्स झाल्या आहेत. १४ कसोटी सामन्यातील २६ डावात गोलंदाजी करताना त्याने या विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज टीम साऊदीलाही पिछाडीवर सोडले आहे. साऊदी याबाबतीत संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायन ५६ विकेट्ससह संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे.

याखेरीज ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (७० विकेट्स) अश्विननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ६९ विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
७१ विकेट्स – आर अश्विन*
७० विकेट्स – पॅट कमिन्स
६९ विकेट्स – स्टुअर्ट ब्रॉड
५६ विकेसट्स – नाथन लायन
५६ विकेट्स – टीम साऊथी
४८ विकेट्स – जोश हेझलवूड

महत्त्वाच्या बातम्या-

बुमराहवर आली उभ्या कारकिर्दीत न आठवू वाटणारी वेळ, शून्यावर बाद होणारा बनला १०००वा भारतीय

न्यूझीलंडच्या नवव्या क्रमांकावरील फलंदाजाचे भारताविरुद्ध ‘विक्रमी’ षटकार, रोहितलाही टाकलं मागे

भारती महिला संघाला वनडे मालिकेत आव्हान देण्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा; ‘ही’ खळाडू करू शकते पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---