भारतीय महिला आणि इंंग्लंड महिला क्रिकेट संघात येत्या २७ जूनपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने अनुक्रम ब्रिस्टल, टॉन्टन आणि वर्सेस्टर या मैदानावर खेळले जाणार आहेत. या मालिकेच्या ४ दिवस आधीच इंग्लंड महिला संघाने आपल्या १६ सदस्यीय एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या संघात एका महिला खेळाडूला सामील केले आहे. या मालिकेतून ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. (England announce 16-member women’s squad for ODIs against India)
रविवारी (२७ जून) ब्रिस्टलमध्ये सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत सोफिया डंकले ही महिला खेळाडू पदार्पण करू शकते. कसोटी सामन्यादरम्यान आपल्या प्रादेशिक संघामधून पुनरागमन करणारी फ्रेया डेविस आणि सारा ग्लेन यांचे इंग्लंड संघामध्ये पुनरागमन झाले आहे. ब्रिस्टलमध्ये भारताविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात जॉर्जिया एल्विस ही एकमेव खेळाडू आहे, जिचा संघामध्ये समावेश नव्हता. तिने 2019 नंतर इंग्लंडसाठी एकदिवसीय सामने खेळले नाहीत.
ICYMI ????
We named a 16-strong squad for the Royal London ODI series against India. pic.twitter.com/s3DO8DnQnr
— England Cricket (@englandcricket) June 23, 2021
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकामध्ये मुख्य प्रशिक्षक लिसा केइटली यांनी सांगितले की, “आम्ही उत्कृष्ट आणि अवघड कसोटी सामन्यानंतर पुन्हा एकदा एकदिवसीय सामने खेळण्यास उत्सुक आहोत. सर्व स्वरूपातील वेगवेगळ्या ठिकाणाच्या स्पर्धा वाढत चालल्या आहे. आमच्याकडे सर्वात मजबूत पर्याय उपलब्ध आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, डॅनी व्हाईट आणि जॉर्जिया एल्विस यांना संघात स्थान दिले गेले नाही. मला माहिती आहे की त्या नाराज झाल्या आहेत. परंतु हे महत्त्वाचं असेल की, त्यांना व्हिटॅलिटी आयटी 20 मालिकेपूर्वी त्यांना प्रादेशिक पातळीवर क्रिकेट खेळण्याची संधी दिली जाईल.”
लिसा म्हणाल्या की, “आम्हाला संघाची गरज आणि खेळाडूंचे गरज यांमध्ये संतुलन राखावे लागेल. आम्ही प्रत्येकाला शक्यतो स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करू.” मालिकेमध्ये एकूण तीन एक दिवसीय सामने असतील ज्यामध्ये प्रत्येकी मालिका मालिकेमध्ये एकूण २ गुण असतील.
भारतीय महिला संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंड महिला संघ-
हीथर नाइट (कर्णधार), एमिली अर्लांट, टॅमी ब्यूमोंट, कॅथरीन ब्रंट, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, टैश फररेंट, सारा ग्लेन, एमी जोन्स, नट साइवर (उपकर्णधार), अन्या श्रुबसोल, मैडी विलियर्स, फ्रैन विल्सन आणि लॉरेन विनफील्ड-हिल
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान
…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ






