---Advertisement---

मुंबई कसोटीत ४ विकेट्स घेत अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गजाला पछाडले, पोहोचला कपिल देवच्या नजीक

R-Ashwin-and-Cheteshwar-Pujara
---Advertisement---

मुंबई कसोटीत भारतीय संघाचे खेळाडू चांगल्याच लयीत असल्याचे दिसते आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात भारतीय संघाने ३२५ धावा केल्या होत्या. मयंक अगरवालच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर संघाने या धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारताच्या गोलंदाजांनी अद्भुत अशी गोलंदाजी केली. परिणामी न्यूझीलंडचा संघ २९ षटकांमध्ये केवळ ६२ धावांवरच गारद झाला.

न्यूझीलंडला या निच्चांकी धावसंख्येवर रोखण्यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याचा मोठा वाटा राहिला. त्याने या डावात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यासह त्याने एका विक्रमात दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज गोलंदाज शॉन पॉलाक यांना मागे टाकले आहे.

न्यूझीलंडच्या या डावादरम्यान अश्विनने ८ षटके गोलंदाजी करताना केवळ ८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने २ षटके निर्धाव टाकली. न्यूझीलंडचे हेन्री निकोलस, यष्टीरक्षक टॉम ब्लंडल, टीम साउदी आणि विलियम सोमरवील हे त्याचे शिकार बनले होते. यासह अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४२३ विकेट्सचा गाठला आहे. यासह तो पॉलाक यांच्यावर वरचढ ठरला आहे. पॉलाक यांनी कसोटी कारकिर्दीत ४२१ विकेट्स घेतल्या होत्या.

पॉलाक यांना मागे सोडत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अश्विन १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता त्याच्यापुढे परदेशी गोलंदाजांसह भारताचे दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे आणि कपिल देव यांचे सुद्धा आव्हान आहे. कुंबळे १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ विकेट्स घेत या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. तर कपिल देव १३१ सामन्यांमधील ४३४ विकेट्ससह नवव्या स्थानावर आहेत. कपिल यांना मागे टाकण्यापासून अश्विन आता केवळ ११ विकेट्सने मागे आहे.

शिवाय कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत, अव्वलस्थानी श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरन यांचे नाव आहे. त्यांनी १३३ कसोटी सामने खेळताना तब्बल ८०० विकेट्स घेतल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचे मातब्बर गोलंदाज शेन वॉर्न हे ७०८ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी १४५ सामने खेळताना ही कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ११० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

INDvsNZ, 2nd Test, Live: दुसऱ्या डावातही एजाजचाच भारताला दणका, मयंक-पुजारा जोडीला केले आऊट

अद्भुत: कुंबळे आणि लॅकरच्या १० विकेट्स प्रत्यक्ष मैदानावार पाहाणाऱ्या ‘त्या’ माणसाबद्दल माहित आहे काय?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---