भारत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. यातील पहिला वनडे सामना बुधवारी (10 जानेवारी) गुवाहाटीमध्ये खेळला गेला. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने घेतलेल्या एका निर्णयाचे सर्वानी कौतुक केले, मात्र संघसहकारी आर अश्विन याने मोठे भाष्य करत ते चुकीचे होते, असे म्हटले आहे.
भारताने दुसऱ्या वनडेत चार विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली. या मालिकेत भारताने प्रभावी कामगिरी केली आहे. पहिला वनडे सामना यजमानांनी 67 धावांनी जिंकला. त्यामध्ये अनुभवी फलंदाज विराट कोहली याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 45वे शतक करत नाबाद 113 धावा केल्या. यामुळे भारताने श्रीलंकेसमोर 7 विकेट्स गमावत 373 धावसंख्येचा डोंगर रचला होता.
या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका जेव्हा फलंदाजीला उतरली तेव्हा मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या एका षटकात खळबळजनक प्रकार घडला. शमीने नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) याला बाद केले. तेव्हा शनाका 98 धावांवर होता. त्यावेळी शमीने शनाकाच्या विकेटसाठी पंचांकडे अपील केली, पण तितक्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शमीला अपील मागे घेण्यास सांगितले.
तो बाद नाही असे शमीने केलेले अपील रोहितने फेटाळले आणि त्यानंतर शनाकाने नाबाद शतकी खेळी केली. या सामन्यानंतर रोहित म्हणाला, “आम्हाला शनाकाला तसे बाद करायचे नव्हते.” त्याच्या या निर्णयाबाबत अश्विन म्हणाला, “जेव्हा खेळाडू पायचीत किंवा स्टम्पच्या मागे झेल घेत बाद होतो तेव्हा गोलंदाजी संघ अपील करतो आणि पंचही त्याला बाद देतात. त्याक्षणी पंच कर्णधाराकडून अपील मागे घेण्याची वाट नाही बघत.”
Shami run-out Shanaka in the non-striker end then Rohit & Shami decided to withdraw the appeal. pic.twitter.com/Zbza30HvFW
— Johns. (@CricCrazyJohns) January 10, 2023
“शनाका जेव्हा 98 धावांवर होता तेव्हा शमीने त्याला नॉन-स्ट्रायकर एंडला बाद करत अपील केले. रोहितने ती अपील मागे घेतली. त्यानंतर अनेकांनी ट्वीट केले. मी पुन्हा एकदा सांगतो तसे बाद करणे काही चुकीचे नाही. पायचीत किंवा झेलबाद आहे की नाही हे विचारण्यासाठी कोणीही कर्णधाराला कौन बनेगा करोडपतीमधील अमिताभ बच्चन यांच्यासारखे प्रश्न विचारणार नाही की तो खरच बाद आहे का नाही?”, असेही अश्विन म्हणाला.
“जेव्हा गोलंदाज तो खेळाडू बाद आहे अशी मागणी करतो आणि तो बाद असले तर तेथेच सगळे संपते. क्षेत्ररक्षकही फलंदाज बाद आहे की नाही हे विचारू शकतो आणि पंचांचे कर्तव्य आहे योग्य निर्णय देणे”, असेही अश्विनने पुढे म्हटले.
शनाकाने त्या सामन्यात 88 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या. (R Ashwin Comment On Rohit Sharma withdrawing appeal Of Dasun Shanaka Wicket INDvSL 1st ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशान, सूर्या बाकावर का? या प्रश्नावर बॅटींग कोच राठोडने अखेर तोडले मौन
एफसी गोवा संघासमोर नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान, दोघांना चूक महागात पडणार