भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच भारतीय टी -२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही त्याची टी२० कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा असणार आहे. दरम्यान आता अशा बातम्या समोर येत आहेत की, कसोटी संघातील खेळाडू देखील विराट कोहलीच्या वृत्तीवर नाराज होते आणि त्यांनी बीसीसीआयकडे याबाबत तक्रार देखील केली आहे. यामध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूचे नाव सर्वात पुढे येत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातील ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीच्या वृत्तीमुळे समस्या निर्माण होत होत्या. इतकेच नव्हे, तर त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्यासाठी जोर वाढू लागला होता. दरम्यान विराटने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी-२० संघाचे कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराटने अश्विनला म्हटले होते की, तो खेळावर लक्ष केंद्रित करत नाहीये. ही बाब अश्विनने बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या कानावर देखील घातली होती. अश्विनने बीसीसीआय सचिव जय शहा यांना सांगितले, की विराटने त्याच्या वागणूकीतून त्याला तो असुरक्षित असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला
परंतु, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अश्विन एकमात्र गोलंदाज होता. ज्याला गडी बाद करण्यात यश आले होते. वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज फ्लॉप ठरत होते. परंतु, अश्विनने न्यूझीलंड संघातील फलंदाजांना अडचणीत टाकले होते.
विराट कोहलीने कार्यभार हलका करण्यासाठी आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी -२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआय त्याला वनडे आणि टी -२० संघाच्या कर्णधार पदावरून काढण्याच्या विचारात होता. कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीच्या एकही स्पर्धेत जेतेपद मिळवून देता आले नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित की सूर्यकुमार, कोणाला बाद करण्यात जास्त मजा आली? रवी बिश्नोईने घेतले ‘हे’ नाव
इंग्लंडमध्येच ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंनी केली होती विराटच्या नेतृत्वाबाबत तक्रार?
“धोनीला भारतीय संघात आणणे याचा अर्थ कोणालाही कमी लेखणे असे नाही”





