---Advertisement---

आर अश्विनची बातच न्यारी!! ‘असा’ कारनामा करत कुंबळे-मुरलीधरनसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

On: मंगळवार, डिसेंबर 7, 2021 11:25 AM
R-Ashwin-Cheteshwar-Pujara
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसरा कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ३७२ धावांनी विजय मिळवला. यासह ही मालिका १-० ने आपल्या नावावर केली. या मालिकेत देखील आर अश्विनच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. या मालिकेतील २ सामन्यात आर अश्विनने १४ गडी बाद केले. या कामगिरीच्या जोरावर त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. दरम्यान त्याने मोठा पराक्रम करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे.

भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन हा दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर याच मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाद करण्याच्या बाबतीत हरभजन सिंगला मागे टाकले होते.

दरम्यान, या संपूर्ण मालिकेत १४ गडी बाद करताच त्याच्या नावे आणखी मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो मायदेशात ३०० पेक्षा अधिक गडी बाद करणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा मुथय्या मुरलीधरन, जेम्स अँडरसन, अनिल कुंबळे, स्टुअर्ट ब्रॉड आणि शेन वॉर्न यांनी केला आहे.

मायदेशात ३०० पेक्षा अधिक गडी बाद करणारे गोलंदाज 
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
जेम्स अँडरसन (इंग्लंड)
अनिल कुंबळे (भारत)
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया
आर अश्विन (भारत)*

मायदेशात जलद ३०० विकेट्स 
यासह तो मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३०० गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. आर अश्विनने हा कारनामा ४९ कसोटी सामन्यांमध्ये केला आहे.

या यादीत सर्वोच्च स्थानी दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आहे. मुथय्या मुरलीधरनने हा कारनामा ४८ कसोटी सामन्यांमध्ये केला होता. तर तिसऱ्या स्थानी दिग्गज भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे आहेत. ज्यांनी हा कारनामा ५२ कसोटी सामन्यांमध्ये केला होता. तर शेन वॉर्नने हा कारनामा ६५ कसोटी सामन्यात केला होता.

मायदेशात सर्वात जलद ३०० गडी बाद करणारे गोलंदाज 
४८ सामने – मुथय्या मुरलीधरन
४९ सामने – आर अश्विन*
५२ सामने – अनिल कुंबळे
६५ सामने – शेन वॉर्न
७१ सामने – जेम्स अँडरसन
७६ सामने – स्टुअर्ट ब्रॉड

महत्त्वाच्या बातम्या – 

एका दिग्गजाची दुसऱ्या दिग्गजाला दाद! आर अश्विनकडून एजाज पटेलला खास भेट, व्हिडिओ व्हायरल

संघ वेगळे, पण नावांनी जोडले! मुंबई कसोटीनंतर वानखेडे स्टेडियमवर दिसले अनोखे दृश्य

“भाई किस लाईन मे आ गये आप”, पुजाराने षटकार मारताच सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---