---Advertisement---

मालिकावीर पुरस्कार पटकावताच आर अश्विनची कॅलिसशी बरोबरी, आता नजर मुरलीधरनच्या विक्रमावर

On: मंगळवार, डिसेंबर 7, 2021 12:19 PM
R-Ashwin-and-Cheteshwar-Pujara
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आणि हा सामना ३७२ धावांनी आपल्या नावावर केला.

भारतीय संघाने न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी ५४० धावांचे आव्हान दिले होते. परंतु न्यूझीलंड संघाला अवघ्या १६७ धावा करता आल्या. या मालिकेत १४ गडी बाद करणाऱ्या आर अश्विन याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो. त्यावेळी आर अश्विन गोलंदाजीला येऊन अडचणीतून बाहेर काढत असतो. या मालिकेत देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. न्यूझीलंडचे फलंदाज जेव्हा टीचून फलंदाजी करत होते, त्यावेळी आर अश्विनने गोलंदाजीला येऊन ब्रेकथ्रू मिळवून दिला होता.

त्याने या मालिकेत एकूण १४ गडी बाद केले. या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. हा त्याचा ९ वा मालिकावीर पुरस्कार आहे. यासह कसोटीत सर्वाधिक वेळेस मालिकावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने दिग्गज खेळाडूची बरोबरी केली आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस मालिकावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. मुथय्या मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ११ वेळेस मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. तसेच या यादीत दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आहे. जॅक कॅलिसने ९ वेळेस हा कारनामा केला होता. आता आर अश्विनने देखील असा कारनामा करत जॅक कॅलिसची बरोबरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस मालिकावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू 
११ वेळेस – मुथय्या मुरलीधरन
९ वेळेस – जॅक कॅलिस
९ वेळेस – आर अश्विन*

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रेयस अय्यरला बर्थडे गिफ्ट!! सामना झाल्यानंतर विराट कोहलीने ‘बड्डेबॉय’चा दिवस केला अविस्मरणीय

सिराजचा ‘जबरा फॅन’ बनला किवी दिग्गज; तुफानी गोलंदाजी पाहून म्हणतोय…

शतकांचा दुष्काळ कधी संपणार ? विराटने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---