---Advertisement---

नाद करा पण अश्विनचा कुठं! 300 असो किंवा 450, भारताकडून त्यानेच घेतल्यात सर्वात जलद विकेट्स

On: गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023 4:46 PM
R-Ashwin-Record
---Advertisement---

क्रिकेट हा आकडेवारीचा खेळ आहे. या खेळात खेळाडूची कामगिरी त्याच्या आकडेवारीवरून ठरते. जर फलंदाजाने जास्त धावा केल्या असतील, तर तो त्या-त्या क्रिकेट प्रकारातील विक्रमवीर म्हणून ओळखला जातो. तसंच, गोलंदाजाने जर वेगाने जास्त विकेट्स घेतल्या असतील, तर त्याचीही गणना विक्रमवीरांमध्ये होते. भारतीय संघातील अनेक खेळाडूंच्या नावावर विक्रम आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अनिल कुंबळे यांसारख्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये आर अश्विन या अनुभवी फिरकीपटूचाही समावेश आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतासाठी खास विक्रम नावावर केला.

‘वेगवान’ विक्रमवीर आर अश्विन
आर अश्विन (R Ashwin) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्याच डावात 3 विकेट्स चटकावल्या. यातील पहिली विकेट्स त्याने ऍलेक्स कॅरे याची घेतली. यासोबतच तो भारतासाठी दुसरा सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 450 विकेट्सचा टप्पा पार केला. यानंतर त्याने आणखी दोन विकेट्स घेत आपल्या 452 विकेट्स पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, अश्विन हा भारताकडून कसोटीत सर्वाधिक जलद 450 कसोटी विकेट्स (R Ashwin Fastest 450 Wickets) घेणारा गोलंदाजही ठरला. त्याने 89 सामन्यात हा विक्रम करून दाखवला. त्याच्याआधी हा विक्रम अनिल कुंबळे (Anil Kumble) याच्या नावावर होता. त्याने 93 कसोटी सामन्यात जलद 450 विकेट्स घेतल्या होत्या.

एवढंच नाही, तर अश्विन हा आतापर्यंत भारतासाठी कसोटीत सर्वात वेगवान विकेट्सचा टप्पा पार करणारा गोलंदाजही आहे. अश्विनने पहिल्या 50 विकेट्स या फक्त 9 सामन्यात घेतल्या होत्या. त्यानंतर पुढील 100 विकेट्स या त्याने 18 सामन्यात घेतलेल्या. पुढे 150 विकेट्स 29 सामन्यात, 200 विकेट्स 37 सामन्यात, 250 विकेट्स 45 सामन्यात, 300 विकेट्स 54 सामन्यात, 350 विकेट्स 66 सामन्यात आणि 400 विकेट्स या 77 सामन्यात घेतल्या होत्या. (r ashwin for IND in Tests see record here)

अश्विनच्या भारताकडून कसोटीत जलद विकेट्स-
वेगवान 50 विकेट्स
वेगवान 100 विकेट्स
वेगवान 150 विकेट्स
वेगवान 200 विकेट्स
वेगवान 250 विकेट्स
वेगवान 300 विकेट्स
वेगवान 350 विकेट्स
वेगवान 400 विकेट्स
वेगवान 450 विकेट्स*

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली विकेट घेताच नावावर झाला मोठा विक्रम, बनला दुसरा भारतीय
क्रिकेटपासून 6 महिने दूर राहिलेल्या जडेजाचा धमाका! कांगारूंच्या बत्त्या गुल करत साकारले विकेट्सचे पंचक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---