---Advertisement---

‘शूजची लेस नाही तर ख्रिस गेलचे पाय…’ दिल्ली वि. पंजाब सामन्यानंतर अश्विनचे ट्विट

On: बुधवार, ऑक्टोबर 21, 2020 8:25 PM
---Advertisement---

मंगळवारी (२० ऑक्टोबर) दुंबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या आयपीएल सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्सने नमवलं. हा त्यांचा हंगामातील चौथा विजय होता. सामन्यादरम्यान दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने पंजाबच्या विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या शूजचे लेस बांधले होते. आता अश्विनने याविषयी अतिशय मजेदार ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये अश्विनने गेलच्या शूजचे लेस बांधतानाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “डेविल (राक्षस किंवा दृष्ट मनुष्य) नेहमी डिटेलमध्ये असतो. ‘गेलला गोलंदाजी करण्यापुर्वी त्याच्या शूजचे लेस नाही तर, त्याचे दोन्ही पाय बांधा.’ दिल्ली कॅपिटल्ससाठी तो वाईट दिवस होता. पण आम्ही पुन्हा दमदार पुनरागमन करू.” या कॅप्शनमध्ये अश्विनने हसतानाचे ३ इमोजीही टाकले आहेत.

युनिव्हर्सल बॉस गेलने या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने दिल्लीचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेच्या षटकात ३ चौकार आणि २ षटकार लगावले होते. मात्र त्यापुढील डावातील ६वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनने दूसऱ्याच चेंडूवर गेलचा त्रिफळा उडवला होता. त्यामुळे गेल १३ चेंडूत २९ धावा करत पव्हेलियनला परतला होता.

महत्त्वाचे म्हणजे अश्विनची गेलला बाद करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. त्याने आयपीएलमध्ये तब्बल ५ वेळा गेलला बाद केले आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही ५ वेळा गेलला तंबूत धाडल आहे. या दोघांव्यतिरिक्त उमेश यादव आणि संदीप शर्मा या गोलंदाजांनीही गेलला ४ वेळा बाद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रीती झिंटाच्या पंजाब संघाचा ‘युनिव्हर्सल बॉस’ आता लढवणार सलमान खानच्या संघाची खिंड?

राजस्थानचा डेविड मिलर बनला डीडीएलजेचा ‘शाहरुख खान’, फोटो होतायेत व्हायरल

एकेकाळी आयसीसीने बॅन केलेला खेळाडू आता ठरलाय आयपीएल २०२०चा ‘मॅच विनर’

ट्रेंडिंग लेख-

ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू

धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---