बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या फिरकीची जादू चालली आहे.
त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पहिले तीन्ही फलंदाजांना बाद करत इंग्लंडला जोरदार धक्के दिले आहेत. याबरोबरच त्याने इंग्लंड विरुद्ध कसोटीत 50 विकेट्स घेण्याचाही टप्पा पार केला आहे.
त्याने या सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 16 षटकांच्या आतच अॅलिस्टर कूक, केटन जेनिंग्ज आणि जो रुट यांना बाद केले. तसेच त्याने पहिल्या डावातही 4 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आता त्याच्या इंग्लंड विरुद्ध कसोटीत क्रिकेटमध्ये 52 विकेट झाल्या आहेत.
इंग्लंड विरुद्ध कसोटीत 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार करणारा तो केवळ सहावाच भारतीय गोलंदाज आहे. याआधी भागवत चंद्रशेखर, अनिल कुंबळे,बिशनसिंग बेदी, कपिल देव आणि विनू मांकड यांनी हा कारनामा केला आहे.
हा टप्पा त्याने इंग्लंड विरुद्धच्या त्याच्या 12 व्या कसोटी सामन्यात केला आहे. यात त्याने एकदा एका सामन्यात दोन्ही डावात मिळून 10 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच एका सामन्यात दोन्ही डावात मिळून त्याने 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट 3 वेळा घेतल्या आहेत.
इंग्लंड विरुद्ध कसोटीत 51 विकेट घेणारा आर अश्विन भारताचा सहावा गोलंदाज
याआधी भागवत चंद्रशेखर(95), अनिल कुंबळे(92),बिशनसिंग बेदी(85), कपिल देव(85), विनू मांकड(54) यांनी केला आहे हा कारनामा.#म #मराठी @Maha_Sports @MarathiBrain @MarathiRT @kridajagat
— Pranali Kodre (@Pranali_k18) August 3, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–कालच्या शतकापेक्षा त्या सामन्यातील शतक माझ्यासाठी खास- विराट कोहली
–सचिन- विराटबद्दल असा योगयोग तब्बल २२ वर्षांनी घडला
–कोहलीचा असाही एक विक्रम, ज्यासाठी सचिन, द्रविडला खेळावे लागले १० सामने जास्त