रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील दिंडीगुल ड्रॅगन्सने 6 विकेटने विजय मिळवत आपले पहिले तामिळनाडू प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले. त्यांनी रविवारी (4 ऑगस्ट) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीएनपीएल 2024च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या लायका कोवई किंग्स संंघाचा धुव्वा उडवला. त्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात अश्विन याने भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची नक्कल केली.
स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा माजी क्रिकेटपटू व विश्वविजेता मुख्य प्रशिक्षक राहुल याच्या हस्ते पार पडला. विजेत्या संघाला त्याच्या हातून ट्रॉफी दिली गेली. ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी अश्विन पुढे आला. त्याने ट्रॉफी स्वीकारताना द्रविडला त्याने टी20 विश्वचषकानंतर केलेले सेलिब्रेशन करून दाखवले. त्यानंतर दोघे हसताना दिसले.
टी20 विश्वचषक विजयानंतर विराट कोहली याने द्रविडकडे ट्रॉफी सोपवली होती. तेव्हा द्रविड अगदी आवेषात सेलिब्रेशन करताना दिसलेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला. विशेष म्हणजे अश्विन याने या व्हिडिओचे कौतुक केलेले.
दिंडीगुल ड्रॅगन्सनं फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात प्रथम फलंदाजी करताना लायका कोवाई किंग्जनं 20 षटकांत 7 बाद 129 धावा केल्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना कर्णधार रविचंद्रन अश्विनने 46 चेंडूत (52) धावा करत फायनल सामन्यात 10 चेंडू शिल्लक असताना ड्रॅगन्सला विजय मिळवून दिला.
RAVI ASHWIN – THE TNPL WINNING CAPTAIN! 🏆
– Rahul Dravid congratulates Ashwin and hands the trophy. 🥹❤️pic.twitter.com/yY6foClUDL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 5, 2024
तामिळनाडू प्रीमीअर लीग 2016 पासून खेळवली जात आहे. यंदाच्या स्पर्धेत तमिळनाडू प्रीमीअर लीगला नवा चॅम्पियन संघ मिळाला. फायनल सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार रवीचंद्रन अश्विनला देण्यात आला. विशेष म्हणजे एलिमिनेटर आणि क्वालिफायर सामन्यात देखील तोच सामनावीर ठरलेला. सध्या अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या केवळ कसोटी संघाचा भाग आहे. मागील वनडे विश्वचषकानंतर त्याला वनडे व टी20 संघात जागा मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
टेबल टेनिसमध्ये भारताचा धमाका, महिला संघ क्वार्टरफायनलमध्ये दाखल…!
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं
IND vs SL कर्णधार रोहित शर्मानं रचला इतिहास..! ‘या’ 4 दिग्गजांना पछाडलं