दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये (Johanasburg) सुरू आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला २४० धावांचे आव्हान आहे. दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ( ५ जानेवारी ) भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज आर अश्विन याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.(sa vs Ind 2nd test)
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने (R ashwin) दुसऱ्या डावात किगन पीटरसनला बाद करत माघारी धाडले. यासह तो मोठा कारनामा करणारा दुसराच भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. जोहान्सबर्गच्या द वांडरर्स स्टेडियमवर अनिल कुंबळे (anil kumble) एकमेव भारतीय फिरकीपटू होते, ज्यांना गडी बाद करण्यात यश आले होते. आता आर अश्विन असा कारनामा करणारा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. परंतु, आर अश्विनने गडी बाद करत दक्षिण आफ्रिका संघाच्या चिंतेत वाढ केली आहे. दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४० धावांची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिका संघाकडून कर्णधार डीन एल्गर आणि किगन पीटरसन यांच्यात भागीदारी झाली होती. त्यावेळी आर अश्विनने किगन पीटरसनला पायचीत करत सामन्यात पुनरागमन करून दिले.
या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांना विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला २२९ धावा करण्यात यश आले होते.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने २६६ धावा केल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २४० धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या दिवस (५ जानेवारी) अखेर दक्षिण आफ्रिका संघाला २ बाद ११८ धावा करण्यात यश आले आहे. तर शेवटच्या दोन दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी १२२ धावांची आवश्यकता असणार आहे आणि भारताला ८ विकेट्सची गरज असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
कोरोनामुळे ‘मेगा लिलाव’ ढकलला जाणार पुढे! बीसीसीआय ऑक्शनची तारिख आणि ठिकाण शकते बदलू
हे नक्की पाहा: