भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना काल अहमदाबादच्या स्टेडियमवर निकाली ठरला. भारतीय संघाने या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत इंग्लंडला १० गडी राखून मालिकेत पराभूत केले. यासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
हा सामना भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनसाठी अतिशय खास ठरला. त्याने या सामन्यात दुसर्या डावात जोफ्रा आर्चरला बाद करत कसोटी कारकिर्दीतील ४०० बळींचा टप्पा गाठला. ही कामगिरी सर्वाधिक वेगाने करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. मात्र हा टप्पा गाठण्यासाठी गेले काही महिने अथक मेहनत घेतल्याचा खुलासा त्याने सामन्यानंतर केला.
लॉकडाऊनच्या काळात घटवले वजन
गेले काही महिने कोरोना विषाणूमुळे अनेक क्रीडा स्पर्धा लांबल्या होत्या. या काळात स्वतःला कसे फिट ठेवले याबाबत बोलतांना अश्विन म्हणाला, “लॉकडाऊनच्या काळात मी जवळपास ७-८ किलो वजन कमी केले. गेली काही वर्षे मी सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने माझे शरीर देखील आता काहीसे थकले आहे. त्यामुळे फिट राहण्यासाठी मला विशेष प्रयत्न करावे लागत आहेत.”
लॉकडाऊनच्या काळानंतर मात्र सगळ्यांनाच एक वेगळा अश्विन पाहायला मिळतो आहे. त्याच्या गोलंदाजीतही विशेष धार जाणवते आहे. याबाबत बोलतांना अश्विन म्हणाला, “ऑस्ट्रेलिया दौर्यापासून गोष्टी माझ्या पक्षात जाण्यास सुरुवात झाली. खरंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी पहिल्या सामन्यापासून खेळेल, अशी मलाही अपेक्षा नव्हती. पण रवींद्र जडेजाला दुखापत झाली आणि मला संधी मिळाली. तिथून माझ्यासाठी गोष्टी खूप उत्तम घडत गेल्या. मात्र अजूनही मी परिपूर्ण आहे, असं म्हणणार नाही. माझ्यात सुधारणेला वाव आहे आणि मी त्या करण्याचा नेहमीच प्रयत्न करेल.”
दरम्यान, अश्विनने या सामन्यात ४०० बळींचा टप्पा गाठताना विविध विक्रमही आपल्या नावे केले. मुथय्या मुरलीधरननंतर तो सर्वात वेगाने ४०० बळी घेणारा गोलंदाज ठरला. तसेच कमीत कमी चेंडूत ४०० बळी घेणारा तो पाचवा गोलंदाज ठरला. याशिवाय पदार्पणानंतर सर्वाधिक कमी कालावधीत ४०० बळी घेणार्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसर्या स्थानी पोहोचला.
महत्वाच्या बातम्या:
पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीतही प्रतिभेचा ठसा उमटवणारे सरनदीप सिंग
ब्रेकिंग! भारताच्या २ विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला युसुफ पठाण क्रिकेटमधून निवृत्त
क्रिकेटसाठी काय पण! विमान सोडून कारने शार्दुल ठाकूरने केला ७०० किमीचा प्रवास, कारण कौतुकास्पद