इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटलमध्ये दोन सामने झाले. या दोन संघात झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला. त्याचवेळी दुसरा सामना दिल्ली कपिटल्सने सहा विकेट्सने जिंकला. परंतु दुसर्या सामन्यात दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद झाला. या वादाबद्दल आर. अश्विनने मौन सोडले आहे.
सामन्यादरम्यान स्ट्रॅटर्जीक टाइम आउटमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली मैदानातील पंचाशी बोलत होता. त्याचवेळी रिकी पॉंटिंग काहीतरी बोलला आणि दोघांमध्ये शाब्दिक युद्ध झाले. सुदैवाने, हा मुद्दा फारसा गाजला नाही.
पॉंटिंगने कोहलीला दिले उत्तर
दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आर अश्विनने नुकताच त्याच्या यूट्यूब शोच्या माध्यमातून या गोष्टीला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला की “पॉंटिंग आणि कोहली यांच्यात काही वादविवाद झाला. मी सामन्यादरम्यान मैदान सोडले होते म्हणून विराट कोहली आणि त्याचा संघ खूष नव्हता. जेव्हा हाच प्रश्न विराटने दिल्ली कॅपिटल्सला विचारला तेव्हा पॉंटिंगने आरसीबीच्या कर्णधाराला उत्तर दिले.”
आम्ही अशा प्रकारचे व्यक्ती नाही -पॉंटिंग
याबद्दल सविस्तर सांगताना अश्विन म्हणाला की, “जेव्हा मी धावत होतो तेव्हा माझ्या कंबरेमध्ये मला समस्या जाणवली. मला भयंकर वेदना होत होती. मी एमआरआय स्कॅन केला आणि नस ओढली गेली आहे याची पुष्टी झाली. गोलंदाजीनंतर मी मैदानातून निघून गेलो. आणि जसे आपण रिकी पॉंटिंगला ओळखता, तो कोणतीही लढाई मध्येच सोडत नाही. आरसीबीने याबाबत विचारणा केली असता त्यांने रागाने म्हटले की आम्ही अशा प्रकारचे व्यक्ती नाही. वगैरे वगैरे …”
https://twitter.com/LoveCricket05/status/1323341094331981824
आर अश्विनने प्रथमच कोहलीला केले बाद
या सामन्यात आर अश्विनने आयपीएलमध्ये प्रथमच विराट कोहलीला बाद केले. याबद्दल बोलताना अश्विन म्हणाला की “मला भारतीय संघातील सहकाऱ्याला गोलंदाजी करायला आवडते. धोनीप्रमाणे कोहलीही माझ्याविरुद्ध चान्स घेत नाही. ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मला नेहमी विराट कोहलीला गोलंदाजी करायला आवडते. तो आपली विकेट देत नाही.”
आर अश्विनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली निवड
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, आर अश्विन आणि कोहली आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यावर सहभागी होतील. भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया दौर्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका, तीन सामन्यांची टी20 मालिका आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अश्विन हा कसोटी मालिकेचा भाग आहे.