दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात बुधवारी (११ मे) आयपीएल २०२२ची ५८वी लढत झाली. दिल्ली संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. हा सामना जिंकत दिल्लीकडे प्लेऑफमधील आपले आव्हान कायम ठेवण्याची संधी होती. या सामन्यात राजस्थान संघाने मोठे पाऊल उचलत फिरकीपटू आर अश्विन याला फलंदाजी क्रमात बढती दिली. अश्विनने या संधीचे नाणे खणखणीत वाजवत विक्रमी कामगिरीही केली.
राजस्थानचा (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलर ७ धावांवर बाद झाल्यानंतर अश्विन (R Ashwin) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. आधी यशस्वी जयस्वाल आणि नंतर देवदत्त पडीक्कल यांना साथीला घेत त्याने तुफानी खेळी केली. ३७ चेंडू खेळताना १३१.५८च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा कुटल्या. २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ५० धावांची (R Ashwin Maiden Half Century) प्रशंसनीय खेळी केली.
हे त्याचे आयपीएलमधील पहिलेवहिले अर्धशतक होते. २००९ पासून आयपीएलमध्ये खेळत असलेला अश्विन यापूर्वी २ वेळा अर्धशतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर बाद झाला होता. २०१३ साली जयपूरमध्ये राजस्थानविरुद्ध त्याने ४६ धावांची खेळी केली होती. तसेच २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ४५ धावांवर तो बाद झाला होता. अश्विनने आयपीएलमध्ये १७९ सामने खेळले असून ५८९ धावा केल्या आहेत.
असा राहिला राजस्थानचा डाव
दरम्यान राजस्थान संघाच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, बटलर या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. यशस्वी जयस्वालही १९ धावांवर बाद झाला. परंतु पुढे अश्विन आणि पडीक्कलने राजस्थानचा डाव सावरला. अश्विनने ५० धावांचे योगदान दिले. तर पडीक्कल ३० चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. त्यांच्या या खेळींच्या जोरावर राजस्थानने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६० धावा केल्या.
या डावात दिल्लीच्या गोलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले. चेतन सकारियाने संघाला २ महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. तसेच एन्रिच नॉर्किया आणि मिचेल मार्श यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! सीएसकेचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर
मेगा लिलावात बक्कळ पैसा मिळाल्याने इशानला आलं होतं टेंशन, मग विराट, रोहितने दिली ‘ही’ टिप
टेल्स बोलला की..?, टॉसवेळी हार्दिक आणि राहुलमध्ये कन्फ्यूजन, गमतीशीर व्हिडिओ पाहिलाय ना