---Advertisement---

अश्विनने सांगितलं आणि एजाजचं अनेक १० वर्ष रखडलेलं काम झटक्यात झालं

R-Ashwin-Ajaz-Patel
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन्ही संघांमध्ये नुकताच २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३७२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिका १-० ने आपल्या नावावर केली.

या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाचा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने एकच डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. दरम्यान हा सामना झाल्यानंतर आर अश्विनने (R Ashwin) एजाज पटेलसाठी एक खास मागणी केली होती.

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. नुकताच त्याने एक ट्वीट केले होते, जे सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याने सोमवारी (६ डिसेंबर) ट्वीट करत लिहिले होते की, “डियर @व्हेरिफाईड, एका डावात १० गडी बाद करणाऱ्या खेळाडूचे अकाऊंट व्हेरिफाय व्हायलाच हवे.” या ट्वीटमध्ये हसण्याचे ईमोजी टाकत त्याने एजाज पटेलला ही टॅग केले होते.

आर अश्विनने हे ट्वीट केल्यानंतर ट्विटरने या गोष्टीची लगेचच दखल घेतली. तसेच एजाज पटेलचे अकाऊंट अवघ्या काही तासातच व्हेरिफाय देखील केले. त्यानंतर आर अश्विनने ट्वीट करत ट्विटरचे आभार मानले. विशेष म्हणजे २०११ साली एजाजने ट्वीटरवर त्याचे अकाऊंट सुरू केले होते. त्यानंतर तब्बल १० वर्षांनी त्याचे अकाऊंट व्हेरिफाय झाले आहे. 

आर अश्विनच्या या ट्विटला २२ हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने ट्विटला प्रतिसाद देत लिहिले की, “खरच त्याचं अकाऊंट व्हेरिफाय झालं पाहिजे, तसेच तो सामनावीर पुरस्कार मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार होता.”

भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला. या दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला एकही सामना जिंकण्यात यश आले नाही. कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३७२ धावांनी विजय मिळवला, तर कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेला सामना अनिर्णीत राहिला होता.

महत्वाच्या बातम्या – 

श्रेयस अय्यरला बर्थडे गिफ्ट!! सामना झाल्यानंतर विराट कोहलीने ‘बड्डेबॉय’चा दिवस केला अविस्मरणीय

शतकांचा दुष्काळ कधी संपणार ? विराटने दिले ‘हे’ उत्तर

सिराजचा ‘जबरा फॅन’ बनला किवी दिग्गज; तुफानी गोलंदाजी पाहून म्हणतोय…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---