बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून खेळला जात आहे. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर रचला. यावेळी श्रेयस अय्यर याने 86 धावांची आणि चेतेश्वर पुजारा याने 90 धावांची उत्तम खेळी केली. त्यानंतर आर अश्विन याने अर्धशतकी खेळी करत संघाला 400च्या पार पोहोचवले. यावेळी अश्विन मेहदी हसन मिराज याच्या गोलंदाजीवर नुरूल हसनकरवी यष्टीचीत झाला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हसनने जेव्हा चेंडू टाकला तेव्हा आर अश्विन (R Ashwin) बाजूला झाला आणि चेंडू थेट विकेटकीपर नुरूल हसन याच्या हातात गेला, ज्याने अश्विनला यष्टीचीत केले. यादरम्यान अश्विन क्रीजच्या बाहेर होता आणि नुरूल त्याची आत येण्याची वाट पाहत होता. जेव्हा अश्विनने आत येण्याचा प्रयत्न केला त्याचक्षणी नुरूलने स्टम्पिंग केले आणि तो बाद झाला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 15, 2022
अश्विनने त्याच्या अर्धशतकी खेळीमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचबरोबर त्याने कुलदीप यादव बरोबर 87 धावांची भागीदारीही केली. कुलदीपने 5 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. त्यानंतर उमेश यादव यानेही झटपट खेळी केली. त्याने 10 चेंडूत 2 षटकाराच्या साहाय्याने नाबाद 15 धावा केल्या.
बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि हसन या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. भारताच्या गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत बांगलादेशच्या 9 फलंदाजांना 150 धावसंख्येच्या आतच बाद केले. हा सामना भारत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळत असून संघाला बांगलादेशविरुद्धचे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. कारण हे दोन्ही सामने भारताने जिंकेल तर संघाच्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा आशा कायम राहतील.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत दुखापत झाली असल्याने तो मुंबईला परतला. दुसऱ्या सामन्यात तो संघपुनरागमन करण्याची शक्यता आहे. R Ashwin Wicket and Nurul Hasan Stumping BANvIND first test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई सिटी एफसी पुन्हा नंबर वन बनण्यासाठी प्रयत्नशील, ईस्ट बंगाल एफसीचा करणार सामना
‘मला कोणीतरी खरेदी करणारच’; 15 वर्षाच्या घझनफारने व्यक्त केला आत्मविश्वास; भारतीय दिग्गजाला मानतो आदर्श