भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने सांगितले आहे की, त्याने चेंडू टाकण्यापुर्वीच नॉन स्ट्रायकर बाजूला उभा असलेला फलंदाज क्रिजच्या पुढे गेल्यामुळे धावबाद केलेल्या विविदात्मक प्रकरणाविषयी (मंकडींग प्रकरणाविषयी) रिकी पाँटिंगशी फोनवर चर्चा केली आहे. पण या चर्चेदरम्यान त्यांच्यात काय बोलणे झाले, याचा खुलासा तो पुढील आठवड्यात करणार आहे. R Ashwin Will Reveal His Chat With Ricky Ponting On Next Week
काही दिवसांपुर्वी अश्विनने म्हटले होते की, तो आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक पाँटिंगशी या विविदात्मक प्रकरणावर चर्चा करेल. तेव्हापासून हा चर्चेचा विषय ठरला आहे. अशात, पाँटिंगशी आपले बोलणे तर झाले, पण नक्की तो काय म्हणाला? यासंदर्भातील माहिती पुढच्या आठवड्यात देण्याचे वक्तव्य करत अश्विनने सर्वांची उत्सुकता दुप्पटीने वाढवली आहे.
झाले असे की, गतवर्षी आयपीएलमध्ये अश्विनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना नॉन स्ट्रायकर बाजूला उभा असलेल्या इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरला चेंडू टाकण्यापुर्वीच क्रिजच्या खूप पुढे गेल्यामुळे धावबाद केले होते. तेव्हा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी हा निर्णय खिलाडूवृत्ती विरुद्ध असल्याचे म्हटले होते. म्हणून अश्विनला त्याच्या संघ प्रशिक्षकाकडे यासंबंधी चर्चा करायची आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विन म्हणाला की, “याविषयी फोनवर बोलण्यापेक्षा समोरासमोर बोलणे अधिक योग्य ठरेल. कारण, ऑस्ट्रेलियाच्या इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांचा आपण वेगळाच अर्थ घेतो, त्यामुळे पूर्णपणे सर्व गोष्टी कळत नाहीत. कधी कधी तर काही तरी उलट सुलट अर्थ निघतात आणि मग त्यांच्या बोलण्याचे हसू बनते. हे प्रकरणही असेच आहे. म्हणून मी पाँटिंगसोबतच्या माझ्या चर्चेचा खुलासा पुढील आठवड्यातच करेन.”
पाँटिंगने या प्रकरणाविषयी बोलताना म्हटले होते की, “त्याची अश्विनसोबत या प्रकरणावर खुप मोठी चर्चा रंगेल आणि जेव्हापर्यंत अश्विन दिल्ली कॅपिटल्सचा भाग असेल, तेव्हापर्यंत त्याला फलंदाजांना अशाप्रकारे बाद करण्याची परवानगी नाही देणार. कारण हे खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध आहे.”
अश्विन हा यंदा आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून युएईत खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२०मध्ये तो आपल्या दमदार गोलंदाजीने संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील ‘या’ संघाला सोडून जायचे होते युवराज सिंगला, नक्की काय होतं कारण
फक्त ०.०१७ टक्क्यांनी हुकला जेम्स अँडरसनचा जगातील सर्वात मोठा विक्रम
आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन आला पुढे
ट्रेंडिंग लेख –
दोन दुर्दैवी फलंदाज जे आयपीएलमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश
आयपीएल २०२०: अशी ४ कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मिळू शकते ५ वे आयपीएल विजेतेपद