---Advertisement---

बापरे! आर अश्विनची पत्नी प्रितीने दिली होती नेहराजींना शिवी? स्क्रीनशॉट होतोय व्हायरल

---Advertisement---

भारताचा फिरकीपटू आर अश्विनची पत्नी प्रीती ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान तर तिने केलेल्या ट्विट्सला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. अगदी तिने ट्विटरवरुन अश्विनला सिडनी कसोटी दरम्यान पाठीचा त्रास होत असल्याचीही माहिती सर्वांना दिली होती. तसेच ऑस्ट्रेलियात अश्विनला करण्यात आलेल्या स्लेजिंगबद्दलही तिने तिची मते मांडली होती.

मात्र, आता ती एका वेगळ्याच कारणाने पण ट्विटमुळेच पुन्हा चर्चेत आली आहे. झाले असे की, सध्या सोशल मीडियावर एका ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे, ज्यात दिसते की ते ट्विट प्रीतीच्या ट्विटर हँडेलवरुन करण्यात आले आहे आहे, तसेच त्या स्क्रिनशॉटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की प्रीतीने ट्विट करत भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराबद्दल अपशब्द वापरला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये दिसते त्याप्रमाणे हे ट्विट १२ मार्च २०११ ला करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या दिवशी २०११ च्या विश्वचषकाचा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला होता आणि या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ६ चेंडूत १३ धावा हव्या असताना तत्कालिन कर्णधार एमएस धोनीने नेहराकडे शेवटच्या षटकात चेंडू सोपवला होता. पण नेहराच्या या षटकात रॉबिन पीटरसनने पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि पुन्हा चौथ्या चेंडूवर चौकार मारत दक्षिण आफ्रिकेला विजयी केले होते.

असे असले तरी, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रीतीच्या ट्विटच्या स्किनशॉटमागील नक्की सत्य बाहेर आलेले नाही. हे ट्विट प्रीतीने केले होते की नाही, याबाबतही कोणतीही स्पष्टता नसल्याने या फोटोमध्ये किती सत्य आहे, यावर प्रश्नचिन्ह आहे.

https://twitter.com/himamshu_7/status/1355912329737605121

https://twitter.com/jaivsr/status/1355910634790027267

https://twitter.com/Advitiya08/status/1355915450895409152

आर अश्विन आणि प्रीती यांचे नोव्हेंबर २०११ मध्ये लग्न झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ही कसली भानगड! २८ वर्षांचा दीपक चाहर झाला थेट ४८ वर्षांचा, बहिणीने केलं ट्रोल

दुनियेचं काय घेऊन बसलात, ‘हे’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही आहेत डिविलियर्सचे चाहते, पाहा ट्विट्स

IND Vs ENG : अवघ्या १२ विकेट्स अन् अश्विन कसोटीतील ‘या’ शानदार विक्रमात ठरेल दुसराच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---