---Advertisement---

टी२० विश्वचषकात टीम इंडियाबरोबर अखेरच्यावेळी काम करण्याबद्दल क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांची भावनिक पोस्ट, म्हणाले…

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 11:40 PM
---Advertisement---

सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघात काही महत्वाचे बदल दिसणार आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकही त्यांच्या पदावरून पायउतार होणार आहेत. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर २०१४ पासून संघासोबत आहेत आणि सध्याचा सुरु असलेला टी२० विश्वचषक त्यांच्यासाठी अखेरची स्पर्धा आहे. त्यांनी बीसीसीआयला त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी अनेकांचे आभार मानले आहेत.

श्रीधर यांनी इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्यासोबत लिहिले आहे की, “जेव्हा मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकाच्या रूपात माझ्या शेवटच्या कामासाठी जाईल, मी बीसीसीआयला धन्यवाद देऊ इच्छितो की, त्यांनी मला २०१४ पासून २०२१ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाची सेवा करण्याची परवानगी दिली. मला वाटते की, मी माझ्या सर्वोत्कृष्ट क्षमतेसोबत स्वतःचे काम उत्साह, इमानदारी आणि प्रतिबद्धतेसोबत पूर्ण केले आहे. हो, कधी कधी चूका झाल्या, पण संघाला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रत्येक चुकीचा फायदा घेतला गेला.”

https://www.instagram.com/p/CVJTYcIBop-/

त्यांनी पुढे लिहिले की, “एक प्रेरणादायी नेता आणि मार्गदर्शक रवी शास्त्रींचे विशेष धन्यवाद. त्यांचा मी ऋणी आहे. कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहली यांचे खूप खूप धन्यवाद, यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सर्व खेळाडू, प्रशिक्षक अनिल कुंबळे, संजय बांगर, विक्रम राठोड, विशेषता वरिष्ठ प्रशिक्षक भरत अरुण यांच्या समर्थनाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो, त्यांच्याकडून मी खूप काही शिकतो आणि इतर सर्व सपोर्ट स्टाफला यासाठी धन्यवाद देतो. ही एक अद्भुत यात्रा होती.”

पोस्टच्या शेवटी त्यांनी त्यांच्या परिवाराती सदस्य आणि मित्रांचे आभार मानले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “मला जबदस्त प्रतिभा असलेल्या खेळाडूंबरोबर काम करण्याची आणि त्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली, त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी मदत करण्याचे सौभाग्य मिळाले. मी स्थायी नात्यांना महत्व दिले आणि आणि अशा आठवणी बनवल्या, ज्यांना आयुष्यभर आणि पुढेही जपून ठेवेल. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, मी माझे कुटुंबीय, माझे मित्र, मीडिया आणि भारतीय क्रिकेटचे असंख्य चाहते आणि हितधारकांचे नेहमी समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी धन्यवाद आणि प्रेम व्यक्त करतो.”

महत्त्वाच्या बातम्या – 

राहुल-ईशानच्या वादळात उडाली इंग्लंड; सराव सामन्यात भारताचा शानदार विजय

हार्दिक म्हणतो, ‘पोलार्ड मनाने गुजराती, पैसे गुंतवायच्या बाबतीत तो भारतीयाप्रमाणे काम करतो’

वेस्ट इंडिजविरुद्ध दिसला बाबरच्या मनाचा मोठेपणा; अशी दाखवली खिलाडूवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---