भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक राहिलेल्या आर श्रीधर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना आलेल्या अनुभवांचे वर्णन केले आहे. त्यांनी याच पुस्तकात असा दावा केला आहे की, माजी कर्णधार एमएस धोनी याने 2015 वनडे विश्वचषकापूर्वी खेळाडूंना संघातून बाहेर करण्याची धमकी दिली होती.
रवी शास्त्री भारतीय संघाचे संचालक तसेच मुख्य प्रशिक्षक असताना श्रीधर यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्याच काळात भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगलाच उंचावला. 2021 टी20 विश्वचषकानंतर त्यांना पदमुक्त केले गेलेले. त्यानंतर त्यांनी आपल्या भारतीय संघासोबतच्या प्रवासा वेळेचे काही अनुभव कोचिंग बियॉंड या पुस्तकात लिहिले. याच पुस्तकात त्यांनी 2014 मधील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एका सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये घडलेल्या प्रकाराचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिले,
‘2014 मध्ये वेस्ट इंडिज संघ वनडे मालिकेसाठी भारतात आला होता. त्यावेळी भारताला वेस्ट इंडीजकडून मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर धोनी अत्यंत नाराज झाला होता. त्याने थेट ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडूंना बोलावून खडे बोल सुनावलेले. त्याने सर्वांना अल्टीमेटम दिला होता की, जर कोणीही आपला फिटनेस सिद्ध करू शकला नाही, तर त्याला 2015 विश्वचषकात जागा मिळणे अवघड आहे.”
श्रीधर यांनी ज्या सामन्याचा उल्लेख केला आहे तो सामना, कोची येथे खेळला गेला होता. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 124 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागलेला. त्यानंतर भारताने दुसरा व चौथा सामना जिंकत मालिका आपल्या नावे केली. तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आलेला. तर, आपल्याच क्रिकेट बोर्डाशी झालेल्या वादामुळे वेस्ट इंडिज संघ अखेरचा सामना न खेळताच मायदेशी परतला होता.
(R Sridhar Reveal Dhoni Gives Ultimatum To All Players Ahead 2015 ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूच्या मित्राचा रणजीत धमाका; नवव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलं खणखणीत शतक
मोठी बातमी! आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर