भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी लिहिलेल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकात सातत्याने नवनवे खुलासे होत आहेत. भारतीय संघातील अनेक माहित नसलेल्या गोष्टी या पुस्तकातून समोर येतायेत. श्रीधर यांच्या याच पुस्तकात एक अशी घटना सांगितली आहे ज्यामुळे भारतीय क्रिकेटची एक नवी सुरुवात झाली.
श्रीधर यांनी आपल्या या पुस्तकात भारतीय संघाच्या 2014-2015 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऍडलेड कसोटीचा उल्लेख करताना एक सकारात्मक गोष्ट सांगितली आहे. श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले,
“त्यावेळी भारतीय संघाने ऍडलेड कसोटी ज्या आक्रमक अंदाजात खेळली त्याचवेळी आम्हाला समजले की, भारतीय संघ यापुढे कशाप्रकारे कसोटी क्रिकेट खेळणार आहे. विराट कोहलीचा त्यावेळचा माईंड सेट आणि अप्रोच आज भारतीय संघाला या स्तरावर घेऊन आला.”
श्रीधर यांनी उल्लेख केलेला सामना हा त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना होता. नियमित कर्णधार एमएस धोनी अनुपस्थित असल्याने विराट कोहलीने या सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 517 धावा केल्यानंतर भारताने कर्णधार विराट कोहलीच्या शतकाने त्यांना 444 पर्यंत उत्तर दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 290 धावांवर घोषित करत, भारतासमोर विजयासाठी 364 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाने अत्यंत आक्रमक खेळ दाखवत अखेरच्या दिवशी हे आव्हान पार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. विराट कोहली याने पुन्हा शतक झळकावले. मात्र, नॅथन लायनने लंच ब्रेकनंतर सात बळी मिळवत भारतीय संघाला विजयापासून 48 धावांनी दूर ठेवले.
याच मालिकेतील दुसरा व तिसरा सामना खेळल्यानंतर धोनीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केलेली. त्यानंतर विराट कोहली पूर्ण वेळ कर्णधार बनला. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी देखील झेप घेतली होती.
(R Sridhar Said 2014 Adelaide Test Is Game Changer For India Test Team Future)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूच्या मित्राचा रणजीत धमाका; नवव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलं खणखणीत शतक
मोठी बातमी! आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर