---Advertisement---

दिल्लीच्या गोलंदाजीला येणार धार! ‘हा’ गोलंदाज आयपीएल २०२१ मध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज

---Advertisement---

आयपीएलचा चौदावा हंगाम भारतात सुरु झाला आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला सात गड्यांनी पराभूत करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. पहिल्या सामन्यात संघाचे दोन अनुभवी गोलंदाज अनुपस्थित असताना दिल्लीने हा विजय मिळवला होता. आता, गुरुवारी (१५ एप्रिल) होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी एक खूशखबर आली आहे.

हा गोलंदाज दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या दुसर्‍या सामन्यापूर्वी क्वारंटाईनमधून बाहेर आला आहे.  बुधवारी, तो हॉटेल क्वारंटाईनच्या बाहेर आला आणि त्याने संघासह प्रशिक्षण सत्रातही भाग घेतला. गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी रबाडा उपलब्ध असेल.

दिल्ली कॅपिटल्सने कगिसो रबाडाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्यात तो गोलंदाजीचा सराव करताना दिसतो आहे.

कगिसो रबाडाने ६ एप्रिलला मुंबईतील टीम हॉटेलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानविरुद्ध दोन वनडे सामने खेळल्यानंतर त्याने भारताकडे प्रस्थान केले होते. यानंतर तो सात दिवस क्वारंटाईनमध्ये राहिला आणि हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी तो आता सज्ज आहे.

मागील हंगामात सर्वाधिक बळी घेतले होते रबाडाने
टॉम करनच्या जागी दिल्ली कॅपिटल्सच्या अकरामध्ये कगिसो रबाडाचा समावेश होऊ शकतो. गेल्या वर्षी त्याने जबरदस्त गोलंदाजी करत, सर्वाधिक बळी घेताना पर्पल कॅप जिंकली होती. रबाडाने ८.३४ च्या इकॉनॉमी रेटने ३० बळी आपल्या नावे केले होते. हेच कारण आहे की, दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. यात कगिसो रबाडा याचे मोठे योगदान होते.

तसेच सध्या गुरुवारी होणाऱ्या सामन्यासाठी एन्रिच नॉर्किए आणि ईशांत शर्मा अद्याप उपलब्ध नाहीत, म्हणून कगिसो रबाडावर अतिरिक्त जबाबदारी असेल. या वर्षी देखील दिल्लीच्या मोहिमेत रबाडाचा महत्त्वाचा भाग असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

आश्चर्यच आहे! आयपीएल इतिहासात आरसीबीने ‘एवढ्या’ वर्षानंतर केला १५० पेक्षा कमी धावांचा बचाव

सानिया मिर्झाच्या वडिलांनी धरले सनरायझर्सला धारेवर, ट्विट करत म्हटले…

“म्हणून हार्दिक, सूर्यकुमार, ईशान हे मनिष पांडेच्या पुढे निघून गेले”, माजी क्रिकेटपटू बरसला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---