---Advertisement---

“म्हणून हार्दिक, सूर्यकुमार, ईशान हे मनिष पांडेच्या पुढे निघून गेले”, माजी क्रिकेटपटू बरसला

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 4:37 PM
---Advertisement---

काल (१४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने, सनरायझर्स हैदराबाद संघाला ६ धावांनी पराभूत करत आयपीएल २०२१ स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मनीष पांडे याने ९८ च्या स्ट्राईक रेटने अवघ्या ३८ धावा केल्या होत्या. यासोबतच तो महत्वाच्या क्षणी चुकीचा शॉट खेळत बाद झाला होता. यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूंनी देखील त्याला खडेबोल सुनावले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिलेल्या १५० धावांचा पाठलाग करताना १६ व्या षटकापर्यंत असे वाटत होते की, सनरायझर्स हैदराबाद संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवेल. परंतु १७ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहबाज अहमदने १ धाव देत ३ गडी बाद केले आणि सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या दिशेने वळवला. यामध्ये मनीष पांडेच्या विकेटचा देखील समावेश होता.

या सामन्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहराने म्हटले की, “रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने अगदी योग्य वेळी डाव्या हाताच्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. ज्याप्रकारे सनरायझर्स हैदराबाद संघाचे फलंदाज मनीष पांडे, जॉनी बेअरस्‍टो आणि अब्दुल समद बाद झाले, असे वाटले की टेल एंडर्स फलंदाज बाद होऊन गेले.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “नवव्या आणि दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजांकडे काहीच पर्याय नसला तर ते फलंदाज लाँग ऑन आणि मिड विकेटच्या क्षेत्रात शॉट खेळण्यासाठी जातात हाच एक मोठा फरक आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या लयीमध्ये असता आणि दबावाच्या परिस्थितीत असता, तेव्हा तुम्हाला माहिती असते की, तोच चेंडू मिड ऑफ किंवा कव्हरच्या दिशेत खेळण्याचा पर्याय उपलब्ध असतो.”

तसेच तो म्हणाला की, “हेच कारण आहे की, हार्दिक पंड्या, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे मनीष पांडेला मागे टाकत पुढे निघून गेले. मनीष पांडेची कारकीर्द या खेळाडूंच्या आधी सुरू झाली होती. असे यामुळे आहे की, या खेळाडूंना दबावाच्या परिस्थितीत कसे खेळावे हे माहीत आहे.”

तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल म्हणाला,” मनीष पांडेने चुकीचा शॉट खेळला. त्याला अशा प्रकारचा शॉट खेळताना पाहणे आश्चर्यकारक होते.”

महत्त्वाच्या बातम्या –

गायक बनला विनोद कांबळी! चाहत्यांसाठी गायले ‘हे’ भक्तीगीत, व्हिडिओ होतोय व्हायरल

हैदराबादच्या धाकड फलंदाजांविरुद्ध ‘अशी’ होती किंग कोहलीची रणनिती, शाहबाजच्या रुपात वापरले ‘सिक्रेट पॅकेज’

कॅप्टन रिषभच्या कामगिरीवर प्रशिक्षक रिकी पाँटिंग भलतेच खुश, ‘या’ दिग्गज कर्णधारांसोबत केली तुलना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---