---Advertisement---

दुर्दैवी अपघातात प्रसिद्ध रेसरचे निधन! पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

On: रविवार, जानेवारी 8, 2023 10:24 PM
---Advertisement---

चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे झालेल्या इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपच्या रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. रविवारी रेस दरम्यान झालेल्या (8 जानेवारी) अपघातात प्रसिद्ध रेसर केई कुमार यांचा मृत्यू झाला. कुमार हे 59 वर्षांचे होते. ट्रॅकवरून बाजूला गेल्यानंतर त्यांची कार कुंपणाला धडकल्याने ही घटना घडली.

या अपघातानंतर शर्यत ताबडतोब थांबवण्यात आलेली. काही मिनिटांतच, कुमार यांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले.‌ ट्रॅकच्या वैद्यकीय केंद्रात प्राथमिक तपासणीनंतर जवळच्या रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्याचा मृत्यू झाला.

 

या स्पर्धेचे संयोजक विकी चंडोक यांनी या अपघातानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले:
“ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कुमार हे अनुभवी रेसर होते. मी त्यांना अनेक दशकांपासून एक मित्र आणि प्रतिस्पर्धी म्हणून ओळखतो. MMSC आणि संपूर्ण रेसिंग संघटना त्यांच्या निधनाबद्दल दुःख होतेय. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.”
या घटनेनंतर दिवसातील सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. तसेच त्यांना सामूहिक श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली.

(Racer KE Kumar Died In Horrific Accident In Chennai)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या वादळी शतकामागे आहे ‘हे’ कारण, टी-20 मालिका जिंकल्यानंतर केला खुलासा
क्रिकेटमध्ये पुन्हा पवार पर्व! रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---