भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारी (२५ नोव्हेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघात प्रत्येक एका खेळाडूने पदार्पण केले. भारताच्या श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली, तर न्यूजीलंडसाठी पदार्पण करण्याऱ्या रचिन रवींद्रने ७ षटके गोलंदाजी केली. पण अद्याप त्याला एकही विकेट मिळाला नाही. दरम्यान, भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि रचिन रवींद्रमध्ये अनेक समानता पाहिल्या गेल्या आहेत.
अय्यर आणि जडेजाने भारतीय संघासाठी महत्वाची शतकीय भागीदारी पार केली. अय्यने १०५ तर जडेजाना ५० धावा केल्या. भारताचा रवींद्र जडेजा आणि न्यूझीलंडचा रचिन रवींद्र यांच्यात या सामन्यादरम्यान अनेक गोष्ट एकसारख्या पाहायला मिळाल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या दोघांच्या नावात रवींद्र हा शब्द एकसारखा आहे. तर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनी सामन्यादरम्यान ८ नंबरची एकसारखीच जर्सी घातली आहे. तसेच दोन्ही खेळाडू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजी करतात. या दोघांतील या सगळ्या समानता पाहून सोशल मीडियावर याविषयी चर्चा होत आहे. चाहते या दोघांविषयी वेगवेगळ्या पोस्ट करत आहेत.
न्यूझीलंडसाठी त्याचा पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या रचिन रवींद्रच्या नावामागे एक खास किस्सा आहे. त्याचे हे नाव भारतीय संघाच्या दोन माजी दिग्गजांच्या नावावरून ठेवले गेले आहे. रचिनचे आई आणि वडील भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. याच कारणास्तव त्यांना त्यांच्या मुलाचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दोन भारतीय दिग्गजांच्या नावावरून ठेवले. रचितच्या आई वडिलांनी राहुल द्रविडच्या नावातील सुरुवातीचा ‘र’ घेतला आणि सचिनच्या नावात शेवटच ‘चिन’ घेऊन ‘रचिन’ असे नाव तयार केले आहे. त्याच्या नावातील शेवटचे रवींद्र हे नाव योगायोगाने भारताच्या रवींद्र जडेजाना नावाशी जुळते, अशी माहिती मिळाली आहे.