अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल हे स्पेनमधील इबीझा बेटावरील लियो रेस्टोरंटमध्ये अचानक समोरा- समोर आले.
यावेळी ‘पॅचा’ या ग्रुपने सादर केलेल्या कॉन्सर्टच्या संगीतात त्या दोघांनी काही वेळ चर्चा केली.
नदाल हा काही दिवसांपूर्वीच इबीझा येथे आला आहे. तो नेहमीच रियल माद्रिदला पाठिंबा देत असतो मात्र बार्सिलोनाचीही तेवढीच स्तुती करतो.
या दोघांपैकी कोणीही त्यांचे एकमेंकासोबतचे काढलेले फोटो सोशल मिडीयावर शेयर केले नाही. पण अर्जेंटीनामधील इंफो बेच्या क्रिस्टीना पेरेझ या पत्रकाराने या दोघांचे काही फोटो काढले.
या दोघांबरोबरच तोटेनहॅम या फुटबॉल क्लबचा एरिक डिअर आणि मॅंचेस्टर सिटीचा मिडफिल्डर रहिम स्टेर्लिंग हे पण उपस्थित होते. ते दोघेही आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लड संघाकडून खेळत असल्याने विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामन्यात खेळले आहेत.
इबीझा हे ठिकाण खेळांडूमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथील मारबेला या भागात फुटबॉलपटू नेमार, क्रिस्तीयानो रोनाल्डो, फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन आणि सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविच यांची घरे असल्याने ते सतत येथे येत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रोएशियाने फ्रेंच फोटोग्राफरला देशात फिरण्यासाठी दिले आमंत्रण
–Video: त्याने फुटबॉल सामन्यादरम्यान मारली चक्क कुंग फू कीक