प्राग । लेवर कप ही स्पर्धा प्रदर्शनीय टेनिस स्पर्धा नसून मी सकाळी ६ वाजता उठून सराव करतो याचा अर्थ ही माझ्यासाठी महत्त्वाची स्पर्धा असल्याचं भाष्य केलं आहे स्पेनच्या राफेल नदालने.
आजपासून सुरु होणाऱ्या आणि पुढे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नदाल हा युरोपियन संघाचा सदस्य असून या संघात रॉजर फेडरर, मारिन चिलीच, डॉमिनिक थिएम, अलेक्झांडर झवेरव आणि टोमास बर्डिच हे खेळाडू आहेत. हे खेळाडू जागतिक संघाशी सामना करतील.
या स्पर्धेबद्दल बोलताना अनेक लोकांनी यावर टीका करताना एटीपीच्या दोन स्पर्धा याच काळात सुरु असताना ही स्पर्धा एक प्रदर्शनीय सामन्यासारखी असल्याचं म्हटलं होत.
याबद्दल बोलताना नदाल म्हणाला, ” ही काही प्रदर्शनीय स्पर्धा नाही. आम्ही येथे आमचा सर्वोत्तम देणार आहे. मी सकाळी ६वाजता उठून सराव केला आहे. मी प्रदर्शनीय सामन्यासाठी सराव करत नाही. “
“आम्ही पूर्ण मनापासून ही स्पर्धा खेळणार आहोत. आमच्याकडे चांगला संघ असून आम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. आता पाहूया आमच्यात ती क्षमता आहे कि नाही? “ असेही नदाल पुढे म्हणाला.