पॅरीस। लालमातीचा बादशहा राफेल नदालने रविवारी 32 वाढदिवस फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीतील सामना जिंकून साजरा केला. त्याने फ्रांन्सच्या रिचर्ड गॅस्केटला 6-3, 6-2, 6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
या सामन्यात सहज विजय मिळवल्यानंतरही नदालला कोर्टवर काही क्षण अणखी खेळताना बघता आले आणि तेही चक्क बॉल बॉयबरोबर.
झाले असे की सामना संपल्यानंतर 2013ची विंबल्डन विजेती मेरियन बार्तोली नदालची मुलाखत घेत होती. या मुलाखतीदरम्यान तिने नदालला सांगितले की “जगभरात तूझे अनेक चाहते आहेत. पण हा बॉलबॉय तूझा खूप मोठ चाहता आहे.”
“रोनाल्ड गॅरोमध्ये तूझ्याबरोबर एकतरी बॉल खेळायला मिळावा असे त्याचे स्वप्न आहे. तो थोडा नर्वस झाला आहे, त्यामुळे कदाचित तो पहिला बॉल मिस करू शकतो.”
यावर नदालने क्षणाचाही विलंब न करता हसून त्याच्या किटबॅगमधील एक रॅकेट काढून त्या बॉल बॉयला दिले आणि त्याला कोर्टवर त्याची जागा घ्यायला सांगितली.
या दोघांच्याही खेळाला प्रेक्षकांनी चांगले प्रोत्साहन दिले. पहिली रॅली संपल्यानंतर अनंदी असणाऱ्या बॉलबॉयला वाटले खेळ संपला, पण नदालने त्याच्यासोबत आणखी एक रॅली खेळली. यानंतर नदालने त्या बॉलबॉयला मिठी मारली.
https://twitter.com/TSNTennis/status/1002937683608506368
अव्वल मानांकीत नदाल या स्पर्धेचा गतविजेता आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत 10 वेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले असून तो यावर्षी 11 व्या फ्रेंच ओपन विजेतेपदासाठी खेळत आहे.
त्याने या स्पर्धेत रविवारी विजय मिळवून चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या मॅक्सिमिलियन मार्टररसोबत होणार आहे.