दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो नुकताच अबुधाबी येथे एका प्रदर्शनीय कार्यक्रमात खेळून दुखापतीतून परतला होता. नदालने स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या प्रदर्शनीय सामन्यात त्याला माजी अव्वल टेनिसपटू खेळाडू अँडी मरे (Andy Murray) याच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. मरेने नदालचा ६-३, ७-५ असा पराभव केला होता.
नदाल गेल्या ४ महिन्यांत पहिला सामना खेळला. तो मरेविरुद्धचा सामना सलग सेटमध्ये हरला. पायाच्या दुखापतीमुळे तो टेनिस कोर्टपासून दूर होता. ऑगस्टपासून तो एकही सामना खेळला नव्हता. त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये लॉइड हॅरिसविरुद्ध तो पराभूत झाला. विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक आणि यूएस ओपनमध्येही तो खेळला नव्हता.
Acabo de recibir la terrible noticia del fallecimiento de nuestro gran Manolo Santana. Como he dicho muchas veces en el pasado: mil gracias por lo que hiciste por nuestro país y por marcar el camino de tantos. Siempre fuiste un referente, un amigo y una persona cercana a todos.
— Rafa Nadal (@RafaelNadal) December 11, 2021
नदालने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘नमस्कार, मला सांगायचे आहे की अबूधाबीहून आल्यानंतर मी माझी आरटी-पीसीआर चाचणी केली. ज्यामध्ये मी कोविड १९ पॉझिटिव्ह आढळलो आहे. कुवेत आणि अबुधाबीमध्ये माझी चाचणी करण्यात आली तेव्हा माझा अहवाल निगेटिव्ह आला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवार आणि शनिवारी या चाचण्या झाल्या. मी सध्या कठीण काळातून जात आहे. मात्र, मला आशा आहे की, सर्वकाही ठीक होईल. मी सध्या घरी क्वारंटाईनमध्ये आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना याबद्दल माहिती दिली आहे.’
अशी राहिली आहे कारकीर्द
नदाल हा २१ व्या शतकातील महान टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत तब्बल २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. तसेच तो अनेक वर्ष एटीपी वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. लाल मातीच्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सलग ८१ विजय त्याने मिळवले आहेत. मात्र, सततच्या दुखापतीमुळे तो सध्या मानांकन यादीत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ ८ संघांनी मिळवली क्वार्टर फायनलमध्ये जागा, पाहा कसे आहे बाद फेरीचे वेळापत्रक