---Advertisement---

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पॅरिस मास्टर स्पर्धेत राफेल नदाल होणार सहभागी

On: बुधवार, ऑक्टोबर 21, 2020 8:01 AM
---Advertisement---

फ्रेंच ओपन 2020 चा किताब जिंकून दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने दाखवून दिले की तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पॅरिस-बर्सी मास्टर्स स्पर्धेत तो सहभागी होईल असे त्याने सांगितले आहे. या स्पर्धेतही आपला फॉर्म कायम राखण्याचा तो प्रयत्न करेल.

https://www.instagram.com/p/CGkKlhvBsCw/?utm_source=ig_embed&ig_mid=F03E2A25-6409-4CA7-B1A0-59041EE894B2

 

महत्वाची बाब म्हणजे, पॅरिसमध्ये नदालने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तरीही त्याने या शहरातील मास्टर्स किताब अद्यापही जिंकला नाही.

शांघाय आणि मियामी मास्टर्सचा किताबही त्याने जिंकलेला नाही. दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर पॅरिस मास्टर्स स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. अशा परिस्थितीत हा किताब जिंकायची त्याच्याकडे उत्तम संधी असेल.

पॅरिसमध्ये कारकिर्दीतील 1000 वा विजय मिळवायची त्याच्याकडे संधी असेल. अमेरिकेचा जिमी कॉनर्स,स्विझर्लंडचा रॉजर फेडरर आणि अमेरिकेचा इव्हान लेन्डल या तीन दिग्गज टेनिसपटूंनी याआधी ही कामगिरी केली आहे.

फ्रेंच ओपननंतर नदालने पॅरिस मास्टर्स स्पर्धेत भाग घेणार की नाही हे स्पष्ट केल नव्हतं. पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला होता की, “माझ्या कुटुंबासमवेत आणि सहकाऱ्यांबरोबर पुढचे दोन दिवस या विषयावर मी चर्चा करणार आहे. मला कोणताही खराब निर्णय घ्यायचा नाही. योग्य निर्णय घेण्यासाठी मला विचार करण्याची गरज आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

जर्मनीच्या झ्वेरेव्हने जिंकले कोलोन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

St. Petersbug Open : रियल ओपाल्कने गतविजेत्या मेदवेदेवला दिला पराभवाचा धक्का

Australia Open : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला क्वारंटाईन नियमांमध्ये हवी सूट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---