---Advertisement---

द्रविडच्या ‘त्या’ क्लबमध्ये सामील झाला रहाणे, सेहवागला पछाडत गेला पुढे

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 5:59 PM
---Advertisement---

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्याला आजपासून (४ मार्च) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी इंग्लंडला २०५ धावांवर सर्वबाद करत भारतीय संघाने पहिला दिवस आपल्या नावे केला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेने बेन फोक्सचा झेल घेत, एका विशिष्ट यादीत स्थान मिळवले.

या यादीत आला सहाव्या स्थानी
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने अहमदाबाद कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्स याचा रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर झेल घेतला. रहाणेचा हा कसोटी कारकिर्दीतील ९२ वा झेल होता.

या झेलासह अजिंक्य रहाणेने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत सहावे स्थान पटकावले. त्याने ९१ झेल घेणाऱ्या माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला मागे टाकले.

अव्वल पाचमध्ये आहेत हे दिग्गज
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत पहिल्या स्थानी ‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड आहे. त्याने २१० झेल घेतले आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक आहे. द्रविडपाठोपाठ दुसऱ्या स्थानी टीव्हीएस लक्ष्मण आहे. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये १३५ झेल घेतले होते.

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. त्याने आपल्या २०० कसोटी सामन्यांच्या मोठ्या कारकिर्दीत ११५ झेल घेतले होते. सचिनपाठोपाठ सुनील गावसकर यांनी १०८ तर मोहम्मद अझहरुद्दीनने १०५ झेल घेतले आहेत.

अजिंक्य रहाणेची कसोटी कारकीर्द
मुंबईसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने भारताकडून २०१३ साली कसोटी पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत ७२ कसोटी सामने खेळताना ४१.७४ च्या सरासरीने ४,५५६ धावा काढल्या आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थित भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळाला होता. त्या मालिकेत रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

रिटायर झालोय, पण खेळ विसरलो नाहीत! युवराज-सचिन-युसूफची धुव्वाधार फलंदाजी, बघा व्हिडिओ

रहाणेला बाद करताच अँडरसनच्या नावे मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा बनला तिसरा वेगवान गोलंदाज

काय अरे पंत! स्टंप्सवरील बेल्स उडून अडकले ग्लोजमध्ये अन् त्याला पत्त्याही नाही, मग काय झालं पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---