मंगळवारी(२९ डिसेंबर) भारताने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. या ८ विकेट्सने मिळवलेल्या विजयाबरोबकच भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने शानदार कामगिरी केली. याबरोबरच विजयी धाव घेताना त्याने एक खास विक्रमही केला आहे.
रहाणेने भारताच्या दुसऱ्या डावात १६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर विजयी धाव घेतली. ही रहाणेच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलीच विजयी धाव ठरली आहे, हे विशेष.
मार्च २०१३ ला कसोटी पदार्पण करणाऱ्या रहाणेने आत्तापर्यंत ६७ कसोटी सामने खेळले असून ११३ डावात फलंदाजी केली आहे. त्यातील १८ सामन्यांतील १५ डावात रहाणेने चौथ्या डावात म्हणजे धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजी केली आहे. यातील केवळ चार वेळा तो नाबाद राहिला आहे. पण या ७ वर्षांच्या कारकिर्दीत त्याला पहिल्यांदाच विजयी धाव काढण्याची संधी मिळाली आहे.
रहाणेने या सामन्यात भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने पहिल्या डावात ११२ आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा मानकरीही घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
मेलबर्न कसोटीतील ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची भरारी, इंग्लंडला पछाडत मिळवलं ‘हे’ स्थान
सिराजचा नेम चुकला अन् चेंडू सरळ सीमारेषेपल्याड, बघा कशा मिळाल्या कांगारूला एक्स्ट्रा धावा
डीआरएसमधील ‘अंपायर कॉल’चा आयसीसीने पुन्हा विचार करावा, सचिन तेंडुलकरची मागणी