---Advertisement---

अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली करोडो भारतीयांची मने ! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सोपवली टी नटराजनच्या हाती

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती.मात्र या सर्व परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

मालिकेत अनेक वेळा अजिंक्यने आपल्या खेळ भावनेने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली. मग ते सिराजला मैदानातून बाहेर जाताना संघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे असो, अथवा युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे असो. अजिंक्यने प्रत्येक वेळी संघाला एकजूट ठेवले. अशातच ब्रिस्बेन कसोटीच्या समाप्तीनंतरही अजिंक्यने केलेली कृती सर्व भारतीयांना आनंद देऊन गेली.

अजिंक्यने सामना संपल्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मिळाली असता ती स्वतःकडे न ठेवता आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या टी नटराजनकडे सोपवली. अजिंक्यच्या या कृतीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे.

भारताचा ऐतिहासिक ब्रिस्बेन कसोटीत विजय – 

ब्रिस्बेन येथे झालेला मालिकेतील शेवटचा सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते. भारताने ७ विकेट्स गमावत ९७ षटकात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला.

दुसऱ्या डावात दुसऱ्या डावात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

जखमी वाघांचा संघ अखेरपर्यंत झुंजला अन् गर्विष्ठ कांगारूंच्या घशातून विजय खेचून आणला! पाहा ‘तो’ अभिमानास्पद क्षण

इंग्लंड विरुद्ध होणार्‍या कसोटी मालिकेसाठी ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची निवड

‘लढवय्या’ चेतेश्वर पुजारा! ‘या’ संकटांचा सामना करत भारतीय संघाची एका बाजूने लढवली खिंड, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---