---Advertisement---

अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा कणा; त्याला संधी द्या – माजी क्रिकेटपटूने खडसावले 

---Advertisement---

सेंच्युरियन । माजी कसोटीपटू आणि अजिंक्य रहाणेचा मुंबईकर संघ सहकारी वासिम जाफरने अजिंक्य रहाणेसाठी चांगलीच फलंदाजी केली आहे. तो संघाचा कणा असून त्याच्यासाठी संघात जागा बनवा असे मत त्याने व्यक्त केले आहे. 

रहाणेला संघातून वगळल्यामुळे संघनिवडीवर मोठी टीका होत आहे. आता त्यात वसीम जाफर सारख्या मोठ्या खेळाडुनेही उडी घेऊन स्पष्ट मत व्यक्त केले आहे. 

“आपला संघ केपटाउन कसोटी सामना पराभूत झाला. परंतु संघ नक्की पुनरागमन करेल परंतु आपण योग्य संघ खेळवायला हवा. अजिंक्य रहाणे हा एक चांगला फलंदाज आहे. तो एक चांगला कसोटीपटू आहे त्यामुळे त्याला संघात जागा द्यायला हवीच. पुजारा आणि रहाणे हे भारतीय कसोटी संघाचे कणा आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायला हवा.” असे वासिम जाफर म्हणाला. 

वासिम जाफर यावर्षीच्या रणजी विजेत्या विदर्भ संघाचा भाग होता आणि या विजयात त्याने मोठा वाटा उचलला आहे. 

तो भारताकडून दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याच्या एका शतकाचा समावेश आहे. 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment