इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. भारतीय संघाचा युवा फिरकीपटू राहुल चहर हा देखील या लिलावात करोडपती बनला.
Up next – Yuzvendra Chahal & who is excited for this one? 😉#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
मागील चार वर्षापासून मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुलने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर भारतीय संघात देखील पदार्पण तो २०२१ मध्ये टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात देखील निवडला गेला होता. आयपीएल मेगा लिलावात त्याच्यावर बोलीची सुरुवात पंजाब व मुंबई संघाने केली. मात्र, त्यानंतर राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल संघाने त्याची बोली वाढवली. पुन्हा एकदा पंजाब व मुंबई त्याच्या साठी बोली लावताना दिसले. अखेरीस, पंजाब किंग्सने ५ कोटी २५ लाख रुपयात त्याला आपल्याकडे खेचले. त्याचा चुलत भाऊ दीपक चहर यालादेखील चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटींमध्ये आपल्या संघात सामील केले.
चार-चार संघ ज्याच्या मागे धावले ‘तो’ अभिनव सदारंगाणी कोण आहे? (mahasports.in)
राहुल नाम तो सुना होगा! ९ कोटींची घसघशीत कमाई करत तेवतिया बनला ‘या’ संघाचा भाग (mahasports.in)
‘धडाकेबाज’ अभिषेकसाठी पंजाब-हैदराबादमध्ये रंगली चुरस; अखेर मोठ्या रकमेसह… (mahasports.in)