---Advertisement---

गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही पुढे! श्रीलंकेच्या ओपनरविरुद्ध योजनात्मक चेंडू टाकत चाहरने स्वत:च टिपला अप्रतिम झेल

On: शुक्रवार, जुलै 30, 2021 2:30 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी (२९ जुलै) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह ही मालिका श्रीलंका संघाने २-१ ने आपल्या नावावर केली आहे. दरम्यान फिरकी गोलंदाज राहुल चाहरने एक अप्रतिम झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला होता. भारतीय संघाला अवघ्या ८१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या संघाला पहिला धक्का राहुल चाहरने दिला होता. त्याने अविष्का फर्नांडोचा अविश्वसनीय झेल टिपला होता.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना सहावे षटक टाकण्यासाठी राहुल चाहर गोलंदाजीला आला होता. तर अविष्का फर्नांडो फलंदाजी करत होता. या षटकातील पाचवा चेंडू चाहरने बॅक ऑफ लेंथला टाकला होता. तो चेंडू टप्पा पडल्यानंतर किती फिरेल याचा फलंदाजाला अंदाज आला नाही. त्यामुळे बॅटच्या खालच्या भागाला चेंडू लागला आणि तो चाहरच्या पुढे पडेल इतक्यात त्याने डाव्या बाजूला डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला आणि अविष्का फर्नांडो १२ धावा करत माघारी परतला.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहरने या डावात ४ षटक गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने अवघ्या १५ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.(Rahul chahar taken unbelievable catch against srilanka to dismiss avishka farnando)

https://twitter.com/SonySportsIndia/status/1420788839640014851?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1420788839640014851%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-32223721281381728789.ampproject.net%2F2107170150000%2Fframe.html

तसेच सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फसला. कुलदीप यादवच्या २३ धावा सोडल्या तर एकही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. २० षटक अखेर भारतीय संघाला ८ बाद ८१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाने हे आव्हान ७ गडी आणि ३० चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. यासह ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.

महत्त्वाच्या बातम्या-

अजिंक्य रहाणेचे खराब प्रदर्शन ‘या’ २ फलंदाजांसाठी खुले करू शकते कसोटी संघाचे दरवाजे

बायो बबल तोडणं आलं अंगाशी; श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूंवर २ वर्षांची बंदी, तर एकटा दीड वर्षासाठी निलंबीत?

द्रविड घेणार का भारताचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांची जागा? स्वत: ‘द वॉल’ने दिले उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---