श्रीलंकेचा पुरुष क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. ते या दौऱ्यात भारताविरुद्ध टी20 मालिका आणि वनडे मालिका खेळणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले जाणार असून दोन टी20 सामने खेळले गेले. ज्यामधील दोन्ही सामने रोमांचक झाले. मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर दोन धावांनी विजय मिळवला, तर दुसरा सामना श्रीलंकेने 16 धावांनी जिंकला. या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून दुसऱ्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीवर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मालिकेतील दुसरा टी20 सामना पुण्यात गुरूवारी (5 जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी या भारतीय खेळाडूंनी नो-बॉल टाकले. अर्शदीपने तर हद्दच केली त्याने 2 षटकात तब्बल 5 नो-बॉल टाकले. त्यामुळे त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 12 नो-बॉल टाकले आहेत. हा एक विक्रमच झाला. या कामगिरीबाबत राहुल द्रविड म्हणाले, “आमचे वेगवान गोलंदाज तरुण आहेत. वाईड किंवा नो-बॉल यांसारख्या चुका होतातच. यामुळे निराश न होता आपण संयम दाखवला पाहिजे. ते खरोखर चांगले शिकत आहेत”.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने कर्णधार दसुन शनाका याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 6 विकेट्स गमावत 206 धावा केल्या. शनाकाने 22 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकार मारत नाबाद 56 धावा केल्या. सलामीवीर कुशल मेंडिस यानेही 31 चेंडूत 52 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवातच अडखळत झाली. भारताने पहिल्या 5 विकेट्स अवघ्या 57 धावसंख्येवरच गमावल्या. तरीही सूर्यकुमार कुमार (51) आणि अक्षर पटेल (65) यांनी हार न मानता कसातरी भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. तरीही 16 धावा कमीच पडल्या.
या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. आता श्रीलंकेने दुसरा सामना जिंकल्याने 7 जानेवारीला राजकोट येथे होणारा तिसरा टी20 सामनाही रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे. कारण दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. (Rahul Dravid After IND loss Against SL said Our fast bowlers are young & Mistakes Happens)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, भावा तू करतोय तरी काय! अर्शदीपच्या नो-बॉलमुळे भडकले टीम इंडियाचे चाहते, रिऍक्शनचा पाऊस
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग 5- लढवय्या साईराज बहुतुले!