दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिकेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिका २-१ ने तर एकदिवसीय मालिका ३-० ने गमवावी लागली. या मालिकेतील पराभवानंतरही भारतीय संघ पुढील वर्षी खेळण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे.
सचिन तेंडुलकरचे असे मत आहे की, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची जोडी एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची भारताची प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न करेल. एका कार्यक्रमात सचिन म्हणाला की, एप्रिलमध्ये ११ वर्ष होतील, भारताने विश्वचषक जिंकलेला नाही. ही दिर्घ प्रतिक्षा आहे. भारतीय संघाने अजून एक विश्वचषक जिंकावा, अशी प्रत्येक क्रिकेट चाहत्याची आणि सचिनची इच्छा आहे.
द्रविड-रोहितची शानदार जोडी
सचिन तेंडुलकर म्हणाला, “विश्वचषक ही अशी ट्राॅफी आहे, ज्यासाठी सर्व क्रिकेटपटू खेळतात. ट्राॅफीपेक्षा मोठे खेळाडूसाठी दुसरे काही असूच शकत नाही. लहान प्रकार असो किंवा मोठा, विश्वचषक हा सर्वांसाठी खासच असतो.”
द्रविड-रोहित या जोडीवर बोलताना तो म्हणाला, “रोहित आणि राहुलची जोडी शानदार जोडी आहे. मला माहित आहे की ते दोघेही त्यांचे सर्वोत्तम देतील. सोबतच एवढे सगळे लोक तुमचे समर्थन करत आहेत तर तुम्हाला आणखीन काय हवं आहे. शेवटी हाच योग्यवेळी भेटण्याचा फायदा आहे. द्रविडने खूप क्रिकेट खेळल्यामुळे त्याला बरीच माहिती आहे. या मार्गात चढ-उतार असतील. आशा न गमवता प्रयत्न करत राहा आणि पुढे जात राहा.”
अधिक वाचा – चक्क सचिन तेंडुलकरचे पैसे बुडवले? अखेर सचिनचाही ‘ही’ लीग खेळण्यास नकार
रोहित शर्मा मर्यादित षटकांचा नवा कर्णधार
गतवर्षी विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर रोहित शर्माला मर्यादित षटकांचा नवा कर्णधार बनवण्यात आले. ६ फेब्रूवारीपासुन सुरु होत असलेल्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा पहिल्यांदाच एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच राहुल द्रविडला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणुन नियुक्त केले आहे. तो सुद्धा या मालिकेत संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी निभवताना दिसणार आहे.
व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
भारताने २०११ साली जिंकलेला शेवटचा विश्वचषक
भारतीय संघाने २०११ मध्ये श्रीलंकेला पराभूत करुन शेवटचा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी होता. तसेच २००७ नंतर टी२० विश्वचषकसुद्धा भारताने जिंकलेला नाही. यावर्षी टी२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. तसेच पुढीलवर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
U19 WC: कोरोनाचा कहर! ‘या’ संघातील ९ खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने २ सामने रद्द