---Advertisement---

राहुल द्रविड यांचे आयपीएलमध्ये पुनरागमन! सांभाळणार या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

On: सोमवार, सप्टेंबर 26, 2022 11:22 PM
Rahul-Dravid
---Advertisement---

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मागील काही काळापासून आयपीएलपासून दूर आहेत. त्यांनी आयपीएल संघांसोबत मागील चार वर्षांपासून कोणतेही काम केले नाही. मात्र, आता त्यांचा आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांचा समावेश मागील वर्षीच या समित्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र,‌ यासंबंधीची गुप्तता पाळली गेलेली. मिळत असलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या तीन समित्यांपैकी दोन समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोलकाता येथे बीसीसीआयच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्रविड यांचा लीगच्या आचारसंहिता समिती आणि तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला. नुकत्याच राज्य संघटनांना पाठवल्या गेलेल्या एजीएमच्या पत्रकांमध्ये राहुल द्रविड यांच्या नावाचा उल्लेख आहे.

बीसीसीआयचा 9000 कोटींहून अधिक निधी न्यायिक खटल्यात रोखला गेल्याचाही या पत्रकात उल्लेख आहे. बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांकडील 9,000 कोटींहून अधिक निधी अनुत्पादक आणि अनुचित खटल्यात अडकला आहे. याचा उपयोग चांगल्या सुविधांसह खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच खेळाचा प्रचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

मागील तीन वर्षांपासून बीसीसीआयच्या समालोचकांच्या पॅनेलमधून बाहेर असलेले संजय मांजरेकर यांचे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत ते समालोचन करताना दिसतील. 2020 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर मांजरेकर यांना वगळण्यात आले होते. कोरोना काळात 2020 मध्ये ही मालिका रद्द करण्यात आली होती. यानंतर मांजरेकर दोन वर्षांपासून बोर्डाचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सवर भाष्य करताना दिसले नाहीत. मांजरेकर हे आयपीएल लिलावावेळी स्टार स्पोर्ट्सवर निमंत्रित समीक्षक म्हणून आले होते. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही त्यांनी समालोचन केलेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! तानिया भाटियाच्या हॉटेल रुममधून खासगी साहित्याची चोरी; लंडनमध्ये घडली घटना
विरोधी संघाला धावा गिफ्ट करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाची साथ सोडून हार्दिक पंड्या निघालाय नवीन दौऱ्यावर, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---