भारतीय क्रिकेटचे नवी पिढी घडवण्याचे सारे श्रेय भारताचा महान फलंदाज व माजी कर्णधार राहुल द्रविड याला जाते. भारताच्या अ संघाचा व एकोणीस वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून त्याने अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवली आहे. जवळपास सर्वच युवा खेळाडू त्याच्याकडून खूप काही शिकलो असल्याचे सांगतात. आता स्वतः राहुल द्रविड याने असा एक खुलासा केला आहे की, त्यावरून समजते तो युवा खेळाडूंना कशा पद्धतीने हाताळतो.
“प्रत्येकाला संधी मिळणार”
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाने राहुल द्रविड याच्याशी संवाद साधला होता. त्यांच्या वृत्तानुसार, राहुल द्रविड युवा खेळाडूंना कशाप्रकारे प्रेरित करतो हे सांगण्यात आले आहे. राहुल द्रविड म्हणतो, “भारतीय संघाचा अ संघाचा व एकोणीस वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक असताना मी निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूला आश्वस्त करतो की, या दौऱ्यावर अथवा मालिकेत तुम्हाला सर्वांना संधी मिळणार आहे. विनासामना खेळता येथून कोणीही जाणार नाही. मी कनिष्ठ स्तरावर क्रिकेट खेळत असताना या गोष्टीचा खूपदा सामना केला आहे. संधी न मिळणे हे दुर्दैवी असते.”
द्रविड याने युवा खेळाडूंची मनस्थिती समजावून सांगताना म्हटले, “तुम्ही देशांतर्गत क्रिकेटच्या एका हंगामात ७००-८०० धावा बनविलेल्या असतात. एकदा निवड होऊन संधी न मिळाल्यास, दुसऱ्या संधीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा इतक्याच धावा बनवाव्या लागतात. कधी कधी सर्वोत्कृष्ट ११ खेळाडू युवा स्तरावर खेळले नाही तरी चालतात, मात्र सर्वांना संधी मिळणे गरजेचे असते.”
भारतीय संघासोबत जाणारी इंग्लंड दौऱ्यावर
राहुल द्रविड याची नुकतीच श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवन भारताचा कर्णधार असेल. राहुल द्रविड २०१५ पासून भारताच्या अ संघाचा तसेच, एकोणीस वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०१८ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. तर, २०१६ व २०२० च्या स्पर्धांमध्ये उपविजेतेपद पटकावलेले. सध्या तो बेंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून काम पाहतो.
महत्वाच्या बातम्या:
श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदी नियुक्त झाल्यावर शिखर धवनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला
या फायद्यासाठी सिराजऐवजी अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी द्या, माजी निवडकर्त्यांचा सल्ला
कोरोना इफेक्ट! डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिसने घेतली या मोठ्या लीगमधून माघार