भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी २० सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्वपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरूण चक्रवर्तीला देखील या दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी वरूणने काही गोष्टींचा खुलासा केला आहे.
भारतीय संघासाठी खेळण्याचे स्वप्नं बाळगणाऱ्या वरूण चक्रवर्तीची गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी निवड झाली होती. परंतु दुखापतीमुळे त्याला या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. तसेच मार्च महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत देखील त्याची निवड झाली होती. परंतु फिटनेस टेस्ट पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले नव्हते.
आगामी श्रीलंका दौऱ्यापुर्वी त्याने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,”मला खात्री आहे की, मी फिटनेस टेस्ट पूर्ण करेल. भारतीय संघाकडून टी२० विश्वचषक खेळणे हे माझे स्वप्न आहे. जरी मीडिया मला ‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणत असेल तरी मी स्वत: ला ‘लेग स्पिनर’ मानतो. लेग-स्पिन चेंडू हा माझ्या भात्यातील चेंडू आहे आणि माझ्याकडे गुगली आणि फ्लिपर्स देखील आहेत. मी माझी गोलंदाजी सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. ”
राहुल द्रविड बद्दल बोलताना म्हणाला…
तसेच तो पुढे म्हणाला,”त्यांनी (राहुल द्रविड) मला म्हटले होते की, तुझ्यात ती क्षमता आहे. काहीही हलक्यात घेऊ नको, समर्पण सुरू ठेव. एनसीएमध्ये मी शिखर धवन सोबत बोललो आहे. तो एक विनोदी व्यक्ती आहे. मी त्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उत्साहित आहे. ”
आगामी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर उपकर्णधार भुवनेश्वर कुमार असेल. १३ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
उलाढाल कोट्यावधींची! सेवा निवृत्तीनंतरही कॅप्टनकूल धोनी करतो ‘विक्रमतोड’ कमाई, पाहा कसं ते
‘केकेआरला ट्रॉफीची चिंता नाही, ते आयपीएलला गांभीर्याने घेत नाहीत,’ कुलदीपचे धक्कादायक भाष्य
SLvIND: संघनायकाची दिव्यदृष्टी! संजूने फारपुर्वीच केली होती त्याच्या सहकाऱ्याच्या निवडीची भविष्यवाणी