---Advertisement---

INDvsPAK: भारताला आणखी एक धक्का, खुद्द द्रविडने सांगितलेय; प्लेइंग इलेव्हनबद्दलही दिलेत संकेत

On: रविवार, सप्टेंबर 4, 2022 10:43 AM
---Advertisement---

रविवारी (04 सप्टेंबर) पुन्हा एकदा आशिया चषक 2022 मध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. सुपर-4 मधील दुसऱ्या सामन्यात या कट्टर प्रतिद्वंद्वी संघांची लढत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. रविंद्र जडेजा याच्यानंतर भारताचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भारत-पाकिस्तान संघातील लढतीपूर्वी पूर्वसंध्येला द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत द्रविड यांनी उलगडा केला आहे की, वेगवान गोलंदाज आवेश खान सध्या ठीक नाही. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या सराव सत्रात सहभाग नोंदवला नव्हता. अशात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या उपस्थितीवर शंका आहे. तसेच आवेशच्या पर्यायी खेळाडूबद्दलही द्रविड यांनी संकेत दिले आहेत. 

पत्रकार परिषदेत बोलताना द्रविड म्हणाले की, “आवेश सध्या पूर्णपणे बरा नाहीये. तो शनिवारच्या सराव सत्रातही सहभागी झाला नव्हता. अपेक्षा आहे की, तो आशिया चषकातील पुढील सामन्यांपूर्वी बरा होईल.” तसेच पुढे बोलताना द्रविड यांनी संकेत दिले की, आवेशच्या जागी अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला आवेशच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

आशिया चषक 2022 साठी असे आहेत दोन्ही संघ-

भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, दिनेश कार्तिक, आवेश खान, दीपक हुड्डा

पाकिस्तान संघ-
मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रौफ, नसीम शाह, हसन अली, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हैदर अली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---