---Advertisement---

‘बर्थडे बॉय’ राहुल द्रविडवर क्रिकेट विश्वातून असा झाला शुभेच्छांचा वर्षाव!

On: शनिवार, जानेवारी 11, 2020 7:39 PM
---Advertisement---

आज (11 जानेवारी) भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) आपला 47 वाढदिवस (47th Birthday) साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट विश्वातील त्याचे संघसहकारी तसेच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताकडून खेळताना द्रविडने 164 कसोटी, 344 वनडे आणि 1 आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला आहे. त्याने कसोटीत 13288धावा, वनडेत 10889 धावा आणि टी20मध्ये 31 धावा केल्या आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून द्रविडला शुभेच्छा देताना लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जॅमी. ज्या प्रकारे तू खेळत होता त्यामुळे गोलंदाजांवर एक जॅमर लागत होता. मित्रा, तुझा वाढदिवस शानदार असावा.”

 

त्याचबरोबर द्रविडचा संघसहकारी व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) द्रविडला शुभेच्छा देताना लिहिले की, “मी माझ्या चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तूझे येणारे वर्षही प्रेमाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे असो.”

भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) द्रविडसोबतचा एक शेअर करत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहुल द्रविड. तू महान आहेस.”

राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट विश्वातून आलेल्या शुभेच्छा-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---