---Advertisement---

…तर आयपीएलमध्ये परतणार राहुल द्रविड; जुन्या संघाने दिली हाक!

On: मंगळवार, जुलै 23, 2024 11:06 AM
Rahul Dravid Ipl Coach
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा स्टार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने गेल्या महिन्यात टी20 विश्वचषक जिंकला होता. 2013 नंतर प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आले. त्यानंतर द्रविड भारतीय संघापासून वेगळा झाला. अर्थातच त्याचा भारतीय संघासोबत असलेले कार्यकाळ संपला. वास्तविक, आता द्रविडच्या जागी गौतम गंभीर भारताचा नवा प्रशिक्षक बनला आहे.

द्रविडने प्रशिक्षक म्हणून त्याच देशात टी20 विश्वचषक जिंकला आहे जिथे तो कर्णधार म्हणून एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत बाहेर पडला होता. 2007 मध्ये तो संघाचा कर्णधार होता. त्यावेळी त्याला यश मिळाले नाही. आता त्याने वेस्ट इंडिजमध्ये प्रशिक्षक म्हणून जेतेपद पटकावले. टी20 विश्वचषकातील यशानंतर द्रविडची मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये पुनरागमन करणार असल्याचे मानले जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करू शकतो. या संघाशी तो बराच काळ कर्णधार म्हणून जोडला गेला होता. त्यानंतर द्रविड संघाचा मार्गदर्शकही होता. वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स आणि द्रविड यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते. 

आगोदर पासूनच द्रविडचे आणि राजस्थान रॉयल्सशी जुने नाते आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ 2013 मध्ये चॅम्पियन्स लीग टी20 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. याशिवाय त्याने संघाला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये नेले. यानंतर 2014 आणि 2015 मध्ये मेंटॉरची भूमिका बजावली. त्यानंतर गुणतालिकेत संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.

राहुल द्रविड 2015 पासून बीसीसीआयशी संबंधित आहे. प्रथम तो भारताच्या अंडर-19 आणि भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, नंतर एनसीएचे अध्यक्ष आणि शेवटी ऑक्टोबर 2021 पासून 2024 पर्यंत भारतीय वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सोबत होता. तर अश्या परिस्थितीत राजस्थान फ्रँचायझी कुमार संगकाराला कायम ठेवणार की नाही हे स्पष्ट नाही. संगाकार 2021 पासून रॉयल्स संघाचा डायरेक्टर आहे. द्रविडच्या आगमनानंतर तो या पदावर राहणार की बाहेर जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका मालिकेपूर्वी, भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल
टीम इंडिया नंतर आता सूर्या होऊ शकतो या संघांचा कर्णधार; आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी खळबळ
टीम इंडियाच्या या स्टार गोलंदाजाचं भविष्य संपलं? एकेकाळी दुसरा बुमराह म्हणून होती ओळख

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---