---Advertisement---

टी20 मालिका गमावल्यानंतरही राहुल द्रविड म्हणतायेत, “डोन्ट वरी”

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजविरूद्धच्या अखेरच्या टी20 सामन्यात पराभूत व्हावे लागले. या सह यजमान संघाने पाच सामन्यांची ही मालिका 3-2 अशी आपल्या नावे केली. यापूर्वी कसोटी व वनडे मालिका जिंकलेल्या भारतीय संघाला टूर स्वीप करण्यात अपयश आले. अखेरच्या सामन्यातील पराभवानंतर बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी फार चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हणत भारतीय संघाला सकारात्मक ठेवले.

तिसरी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी केवळ सूर्यकुमार यादव अर्धशतक करू शकला. सूर्यकुमारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 45 चेंडूत 61 धावांची खेळी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये भारतीय संघ 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने हे लक्ष्य 8 गडी राखून गाठले. सलामीवीर ब्रँडन किंग याने 55 चेंडूत 85 धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर वेस्ट इंडीजचा अनुभवी फलंदाज निकोलस पूरन मालिकावीर ठरला.

या सामन्यानंतर बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले,

“संघाने संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली. एखादा पराभव भारतीय संघाचे मनोधैर्य खच्ची करू शकत नाही. आगामी वनडे विश्वचषकाचा विचार केला तर फारशी काळजी करण्याची गरज नाही. आमचा वनडे संघ या संघापेक्षा भरपूर वेगळा आहे. मात्र, काही छोट्या छोट्या कमी लवकरच दूर करण्यात येतील.”

भारतीय वनडे संघात नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे फलंदाज आहेत. तर अष्टपैलू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज हे दिसून येतात.

(Rahul Dravid not worried about India World Cup squad)

महत्वाच्या बातम्या-  
आकडे बोलतायेत! 2021 पासून भारतीय संघाने अभिमान करावा अशी कामगिरी केलीच नाही
मालिका गमावली पण तिलक कमावला! टी20 मालिकेतून टीम इंडियाला मिळाला फ्युचर स्टार 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---