Mohammad Nabi Rohit Sharma Controversy: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसर्या टी20 सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबी यांच्यात वाद झाला. यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “हा गंभीर मुद्दा नाही. जेव्हा खेळाडू आपल्या देशासाठी खेळतात तेव्हा अशा गोष्टी घडतात.”
खरं तर, पहिल्या सुपर ओव्हरमध्ये, जेव्हा अफगाणिस्तानची धावसंख्या 13 होती, तेव्हा मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने मुकेश कुमार (Mukesh Kumar) याच्या यॉर्कर चेंडूवर धावा काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू तिथेच राहिला आणि यष्टिरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) याने त्याला धावबाद करण्यासाठी नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने चेंडू फेकला, पण चेंडू मोहम्मद नबीच्या अंगाला लागलाआणि लांबवर उभ्या असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे गेला. याचा फायदा घेत नबी धावला आणि बायच्या रूपाने दोन जादा धावा घेतल्या. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला ही गोष्ट आवडली नाही आणि तो मैदानावरच मोहम्मद नबीशी भांडला. दोन्ही खेळाडूंमध्ये बराच वेळ वाद झाला. खिलाडूवृत्ती दाखवत नबीने त्या दोन अतिरिक्त धावा घेल्या नको होत्या असे रोहित शर्माचे मत होते. (rahul dravid plays down nabi rohit confrontation after 1st super over)
Lafda bw Rohit & Nabi in superover 🤯#INDvsAFG #RohitSharma𓃵 pic.twitter.com/cIQc0BCJpt
— Subhash Choudhary (@SubhashGodara09) January 18, 2024
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल द्रविडला याबाबत विचारले असता, तो म्हणाला, “सामन्यांमध्ये असे प्रकार घडतात. माझ्या मते, जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा तुम्ही खूप उत्कट आणि भावनिक होतात. मला वाटते की, हा सामना इतका रोमांचक झाला हे आश्चर्यकारक होते. हा सर्व खेळाचा भाग आहे. राग फक्त मैदानातच राहतो. नबीने नियमानुसार बरोबर केले. पहिल्या टी-20 मध्ये आम्हीही असे केले होते.” (IND vs AFG Rahul Dravid’s big statement on Rohit-Nabi controversy He said The Prophet according to the rules)
हेही वाचा
IND vs AFG: ‘सामना एक विक्रम अनेक’ बेंगलोर टी20 मध्ये बनले ‘हे’ मोठे विक्रम, जे मोडणे केवळ अशक्यच
IND vs AFG: ‘ती अश्विनची विचारसरणी होती…’ रोहित रिटायर्ड बाद होण्यावर प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं लक्षवेधी विधान