---Advertisement---

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पोहचला जयपूरमध्ये, टीम इंडियाचे ‘हे’ खेळाडूही ‘पिंकसिटी’मध्ये दाखल

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 11:55 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सपाटून पराभव पत्करावा लागला. आता भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध टी२० मालिका खेळण्यास तयार झाला आहे. १७ नोव्हेंबरला जयपूरमध्ये होणाऱ्या टी२० सामन्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. राहुल द्रविड, व्यंकटेश अय्यर, अवेश खान, मोहम्मद सिराज, आर अश्विन, इशान किशन, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) जयपूरला पोहोचले.

चाहत्यांनी भारतीय खेळाडूंचे जोरदार स्वागत केले. यादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडू हॉटेल मॅरियटमध्ये पोहोचले. सर्व खेळाडूंनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. अक्षर पटेल, राहुल द्रविड, व्यंकटेश अय्यर, अवेश खान, अश्विन, इशान किशन, श्रेयस अय्यर आणि इतर खेळाडू देखील जयपूरला पोहोचले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. राहुल द्रविडची भारताचा नियमित प्रशिक्षक म्हणून पहिली परीक्षा जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जयपूरमध्ये पहिला सामना खेळणार आहे.

सवाई मानसिंग स्टेडियमवर तब्बल ८ वर्षांनंतर होणारा हा क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वीच अनेक अर्थांनी खास बनला आहे. वेंकटेश अय्यर आणि अवेश खान यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत पहिल्यांदाच संधी दिली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना जयपूर येथे होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवडलेल्या सर्व १६ खेळाडूंना १३ नोव्हेंबरपर्यंत जयपूरला पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंड संघाचे खेळाडू जयपूरला पोहोचणार आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अक्षर पटेल, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या – 

संघाचे नेतृत्व करायची इच्छा असली तरी ‘या’ तीन भारतीय दिग्गजांना कर्णधारपद मिळण्याची शक्यता कमीच

बाबर आझमने केले मान्य, उपांत्य सामन्यात ‘या’ गोष्टी संघासाठी पडल्या महागात

आझमचा विराटच्या आणखी एका विश्वविक्रमाला धक्का! ‘या’ यादीत मिळवला अव्वल क्रमांक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---