भारतीय क्रिकेट संघाचा आता आंतरराष्ट्रीय हंगाम सुरू होत असून हा हंगाम बराच व्यस्त राहणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ९ जूनपासून १९ जूनपर्यंत ५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ युरोप दौऱ्यात खेळताना दिसणार आहे. दरम्यान, युरोप दौऱ्यासाठी भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविड, यष्टीरक्षक रिषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे भारतीय संघातील अन्य खेळाडूंपेक्षा उशीरा जाणार आहेत.
युरोप दौऱ्यात भारताला आयर्लंडविरुद्ध २ टी२० सामने खेळायचे आहेत. तसेच इंग्लंडविरुद्ध १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. तसेच या दौऱ्यादरम्यान सराव सामनेही होणार आहेत. हा दौरा साधारण २४ जूनपासून सुरू होईल. २४ ते २७ जून दरम्यान भारताला इंग्लंडमध्ये सराव सामना खेळायचा आहे. याचदरम्यान आयर्लंडमध्ये २६ आणि २८ जून रोजी टी२० सामने खेळवले जातील. या दोन्ही सामन्यांसाठी भारताचा प्रभारी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण असणार आहे. तसेच या सामन्यांसाठी वेगळा संघ निवडला जाऊ शकतो. तर द्रविड इंग्लंडमध्ये भारतीय संघाबरोबर असेल.
भारतीय संघ १६ जूनला होणार इंग्लंडला रवाना
बीसीसीआयने १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात केएल राहुल (KL Rahul), रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या तिन्ही खेळाडूंचाही समावेश आहे. पण, हे तिन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेचाही भाग आहेत.
त्यामुळे क्रिकेटबझने दिलेल्या वृत्तानुसार १९ जूनला ही मालिका संपल्यानंतर हे तिन्ही खेळाडू राहुल द्रविडसह बंगळुरूमधून इंग्लंडला रवाना होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अखेरचा टी२० सामना बंगळुरूमध्ये १९ जून रोजी खेळवला जाणार आहे.
तर, त्यापूर्वी कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या संघातील अन्य खेळाडू १६ जून रोजी इंग्लंडला जातील. त्यांच्याबरोबर द्रविड जाणार नसला तरी, सपोर्ट स्टाफमधील सदस्य जाणार आहेत. त्याचमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी द्रविडला सहाय्यक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षक भारतीय संघात दाखल झाले आहेत.
पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका संपल्यानंतर मात्र त्वरित द्रविड, पंत, राहुल, अय्यर इंग्लंड दौऱ्यावर जातील. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी अशा सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू आता इंग्लंड दौऱ्यातच खेळताना दिसणार आहेत. दरम्यान, रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेत भारताचे नेतृत्व करेल.
इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेचे पूर्ण वेळापत्रक (India Tour Of England)-
१-५ जुलै: कसोटी सामना (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम) (रिशेड्यूल्ड सामना)
टी२० मालिका
७ जुलै: पहिला टी२० सामना (द रोझ बाउल, साउथम्प्टन)
९ जुलै: दुसरा टी२० सामना (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
१० जुलै: तिसरा टी२० सामना (ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
वनडे मालिका
१२ जुलै: पहिला वनडे सामना (केनिंग्टन ओव्हल)
१४ जुलै: दुसरा वनडे सामना (लॉर्ड्स, लंडन)
१७ जुलै: तिसरी वनडे सामना (एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
आयर्लंड विरुद्ध भारत टी२० मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
२६ जून – पहिला टी२० सामना (द व्हिलेज, डब्लिन)
२८ जून – दुसरा टी२० सामना (द व्हिलेज, डब्लिन)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
पुरुष नाही महिला क्रिकेटपटूंनी रचला होता इतिहास, वनडे सामन्यात ठोकलेल्या ४९१ धावा
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून
जेव्हा भारतीय संघाच्या अकराच्या अकरा खेळाडूंनी केली होती गोलंदाजी, वाचा त्या सामन्याबद्दल