भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर-19 संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. पण या सामन्यात भारताचा माजी फलंदाज आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. संघात निवड झाल्यानंतर समित द्रविडबाबत मोठी चर्चा झाली होती. अश्या स्थितीत त्याला संघात स्थान मिळणार असे सर्वांना वाटत होते. पण समितला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुद्दुचेरी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. केपी कार्तिकेय आणि कर्णधार अमन खान यांनी टीम इंडियासाठी शानदार खेळी खेळली. ज्यामुळे टीम इंडिया सहज जिंकली. केपी कार्तिकेयने 99 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 85* धावा केल्या. याशिवाय कर्णधार अमनने 89 चेंडूंत 5 चौकारांसह 58* धावा केल्या.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी 49.4 षटकांत अवघ्या 184 धावांत गुंडाळले. संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या स्टीव्हन होगनने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 94 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. तर गोलंदाजीत भारताकडून मोहम्मद अनानने सर्वाधिक 4 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 36 षटकांत 185/3 धावा करून विजय मिळवला. संघाला पहिले तीन झटके झटपट बसले. टीम इंडियाने 5 षटकात 32 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर केपी कार्तिकेय आणि कर्णधार अमन खान यांनी शानदार खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. दोन्ही फलंदाजांनी नाबाद माघारी परतत संघाला विजय मिळवून दिला. दोन्ही फलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते.
हेही वाचा-
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत अश्विन टॉप-2 मध्ये, तर हा गोलंदाज नंबर-1 वर
चेन्नईचं ठरलं! या 5 खेळाडूंना करणार रिटेन; थाला धोनीबाबत मोठं अपडेट
रिषभ पंतच्या शतकावर ‘खास व्यक्ती’ची प्रतिक्रिया, अवघ्या 3 शब्दात व्यक्त केल्या भावना